MS Dhoni master plan worked against Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी (23 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 15 धावांनी विजय मिळवत थाटात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
या सामन्यात पुन्हा एकदा कॅप्टनकूल एमएस धोनीचे शानदार नेतृत्व पाहायला मिळाले. त्याने वापरलेली रणनीती चेन्नईसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. दरम्यान, या सामन्यात धोनीने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीला आल्यानंतर लावलेल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचेच लक्ष वेधले.
चेन्नईने या सामन्यात गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने वृद्धिमान साहाची विकेट तिसऱ्याच षटकात गमावली होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला हार्दिक पंड्या आला होता.
त्यावेळी धोनीने पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजेच 6 व्या षटकात फिरकीपटू महिश तिक्षणाला गोलंदाजीला आणण्याची चाल खेळली. तसेच या षटकात 5 व्या चेंडूच्या आधी धोनीने ऑफ-साईडला आणखी एक क्षेत्ररक्षक लावला.
त्यामुळे धोनीने रचलेल्या या सापळ्यात हार्दिक अडकला. हार्दिकने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तिक्षणाने टाकेलेल्य सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूने हार्दिकच्या बॅटची कड घेतली. त्यावर रविंद्र जडेजाने बॅकवर्ड पाँइंटला सोपा झेल घेतला. त्यामुळे हार्दिकला केवळ 8 धावांवर विकेट गमवावी लागली.
त्यानंतरही गुजरातनेही नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. एक बाजू शुभमन गिलने सांभाळली होती. मात्र, तोही 42 धावांवर बाद झाला. त्याच्याव्यतिरिक्त केवळ राशिद खानने 20 धावांचा टप्पा ओलांडला. राशिदने 30 धावांची खेळी केली. गुजरातचा संघ 20 षटकात 157 धावांवर सर्वबाद झाला.
चेन्नईकडून रविंद्र जडेजा, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच डेव्हॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली.
त्याचबरोबर अखेरीस रविंद्र जडेजानेही 22 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.