Football  Dainik Gomantak
क्रीडा

ISL: निसटत्या विजयासह हैदराबाद अग्रस्थानी

उपांत्य फेरीकडे कूच; एफसी गोवा पराजित

दैनिक गोमन्तक

पणजी: हैदराबाद एफसीने झुंजार खेळ केलेल्या एफसी गोवास 3-2 असे निसटते हरवून शनिवारी रात्री आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान राखत उपांत्य फेरीकडे कूच केली. सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला. (Football Goa)

हैदराबादचा हा 17 लढतीतील नववा विजय ठरला. 32 गुणांसह ते पहिल्या स्थानी आहेत. एफसी गोवास 18 लढतीत आठवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचे 18 गुण आणि नववा क्रमांक कायम राहिला. त्यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. आयएसएल इतिहासात एफसी गोवाविरुद्ध (FC Goa) सहा लढतीत हैदराबादने नोंदविलेला हा पहिलाच विजय ठरला.

हैदराबादने (Hyderabad) सामन्याच्या 25 व्या मिनिटास नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे याच्या भेदक हेडिंगमुळे आघाडी मिळविली. नंतर 35 व्या मिनिटास मोसमातील वैयक्तिक आठवा गोल नोंदवत स्पॅनिश होर्गे ओर्तिझ याने एफसी गोवासाठी बरोबरीचा गोल केला. 41 व्या मिनिटास ओगबेचे याचा डाव्या पायाचा सणसणीत फटका अडविण्यासाठी एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग झेपावला, पण त्याला अपयश आल्याने हैदराबादने विश्रांतीपूर्वी 2-1 अशी आघाडी प्राप्त केली. 70व्या मिनिटास ब्राझीलियन जुवाव व्हिक्टर याने हैदराबादची स्थिती आणखीनच बळकट करणारा गोल केला. 73 व्या मिनिटास बदली खेळाडू देवेंद्र मुरगावकरच्या वेगवान हेडिंगवर चेंडू रोखणे हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला शक्य झाले नाही, त्यामुळे एफसी गोवाची पिछाडी 2-3 अशी कमी झाली.

ओगबेचे याचा ‘अव्वल’ धमाका

आयएसएल स्पर्धेत, तसेच यंदा सर्वाधिक गोल करण्याचा दुहेरी धमाका हैदराबादचा आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे याने शनिवारी केला. एफसी गोवाविरुद्ध हैदराबादला त्याने आघाडी मिळवून दिल्यानंतर त्याच्या खाती स्पर्धेत पन्नास गोल जमा झाले आणि त्याने बंगळूर एफसीचा सुनील छेत्री याला गाठले. नंतर विश्रांतीपूर्वी त्याने आणखी एक गोल करून आयएसएलमध्ये (ISL) सर्वाधिक 51 गोल नोंदविण्याचा मान मिळविला. स्पर्धेत यंदा त्याने 16 सामन्यांत 16 गोल केले असून हा 37 वर्षीय आघाडीपटू गोल्डन बूटच्या शर्यतीत खूप पुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT