Indian Super League Football Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: स्पॅनिश फुटबॉलपटू इकेर ग्वोर्रोचेनाच्या 2 गोलमुळे एफसी गोवास गुण

जमशेदपूर एफसी संघाशी झालेला सामना 2-2 असा बरोबरीत

Akshay Nirmale

Indian Super League Football: सलग सात पराभवानंतर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पहिला गुण मिळविलेल्या जमशेदपूर एफसीविरुद्ध गुरुवारी रात्री एफसी गोवा संघाला इकेर ग्वोर्रोचेना याच्या दोन गोलमुळे पराभव टाळता आला. जमशेदपूर येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात झालेला सामना 2-2 असा गोलबरोबरीत राहिला.

जमशेदपूरला मिळालेल्या कॉर्नर फटक्यावर ग्वोर्रोचेना याचे हेडिंग चुकले व चेंडू एफसी गोवाच्या गोलनेटमध्ये गेला. प्रतिस्पर्ध्यांच्या स्वयंगोलमुळे जमशेदपूरला 31 व्या मिनिटास आघाडी मिळाली. चुकीची भरपाई करताना ग्वोर्रोचेना याने 38 व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला. 50 व्या मिनिटास एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याच्या निष्काळजीपणाचा फायदा उठवत ईशान पंडिता याने जमशेदपूरला 2-1अशी आघाडी मिळवून दिली.

ऐबान्भा डोहलिंग याने केलेल्या पासवर धीरज चेंडू अडविण्यासाठी जागा सोडून पुढे आला, मात्र पायाचे नियंत्रण गमावून बसला. ही संधी साधताना पंडिताने चेंडू हिसकावून घेतला आणि मोकळ्या गोलनेटसमोरून आरामात गोल केला. जमशेदपूर संघ दीर्घ कालावधीनंतर विजय नोंदविण्याची शक्यता असताना ग्वोर्रोचेना याने ८९व्या मिनिटास एफसी गोवाचा एक गुण नक्की करणारा गोल नोंदविला.

एफसी गोवाची ही 11 लढतीतील पहिलीच बरोबरी ठरली. त्यांचे आता 19 गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्स व ओडिशा एफसीचेही तेवढेच गुण आहेत, मात्र गोव्यातील संघाची सरासरी चांगली असल्याने त्यांना चौथा क्रमांक मिळाला. मात्र विजय शक्य न झाल्यामुळे त्यांना तिसरे स्थान हुकले. जमशेदपूरची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी आहे. ते आता 11 लढतीनंतर पाच गुणांसह दहाव्या क्रमांकावर कायम आहेत.

दृष्टिक्षेपात...

- ‘आयएसएल’मधील 12 लढतीत एफसी गोवा व जमशेदपूर यांच्यात 2 बरोबरी

- अन्य लढतीत एफसी गोवाचे 6, तर जमशेदपूरचे 4 विजय

- एफसा गोवाच्या इकेर ग्वोर्रोचेना याचे 11 लढतींत 5 गोल

- जमशेदपूरच्या ईशान पंडिताचे 10 सामन्यांत 2 गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT