जेम्स डोनाकीने मायभूमीतील ए-लीग स्पर्धेतील न्यूकॅसल जेट्स संघाला सोडचिठ्ठी देत सिडनी एफसीशी करार केला आहे. Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाचा डोनाकी पुन्हा ऑस्ट्रेलियात

मायभूमीतील ए-लीग (A-League) स्पर्धेतील न्यूकॅसल जेट्स संघाला सोडचिठ्ठी देत सिडनी एफसीशी (Sydney FC) करार केला आहे. एफसी गोवाने 28 वर्षीय डोनाकी याला न्यूकॅसल जेट्सकडून `लोन`वर करारबद्ध केले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: गतमोसमात एफसी गोवातर्फे (FC Goa) `लोन`वर खेळलेला बचावपटू जेम्स डोनाकी (James Donachie) पुन्हा ऑस्ट्रेलियात (Australia) परतला आहे. मायभूमीतील ए-लीग (A-League) स्पर्धेतील न्यूकॅसल जेट्स संघाला सोडचिठ्ठी देत सिडनी एफसीशी (Sydney FC) करार केला आहे.

गतमोसमातील इंडियन सुपर लीग (ISL) (आयएसएल) आणि एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी एफसी गोवाने 28 वर्षीय डोनाकी याला न्यूकॅसल जेट्सकडून `लोन`वर करारबद्ध केले होते. आयएसएल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या एफसी गोवातर्फे हा सेंटर-बॅक खेळाडू 18 सामन्यांत 1506 मिनिटे खेळला, तर एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत त्याने गोव्यातील संघाचे 5 सामन्यांत 450 मिनिटे प्रतिनिधित्व केले.

डोनाकी यापूर्वी ए-लीग स्पर्धेत ब्रिस्बेन रोअर, मेलबर्न व्हिक्टरी या संघाकडूनही खेळला असून ऑस्ट्रेलियाचे 23 वर्षांखालील वयोगटात प्रतिनिधित्व केलेल्या या बचावपटूपाशी सव्वाशेहून जास्त ए-लीग सामन्यांचा अनुभव आहे.

गतमोसमात एफसी गोवाच्या बचावफळीत डोनाकी प्रमुख आधारस्तंभ होता. तो पुन्हा मायदेशी परतल्यामुळे आगामी मोसमासाठी एफशी गोवास आता आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) सदस्य देशातील नवा खेळाडू शोधावा लागेल. एफसी गोवाने भावी वाटचालीसाठी डोनाकीला शुभेच्छा दिल्या असून संघासाठी दिलेल्या योगदानासाठी आभारही मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT