Reliance Development League Dainik Gomantak
क्रीडा

RFDL: FC Goa ची विजयी मालिका कायम, श्रीनिदी डेक्कनवर तीन गोलने शानदार विजय

गोव्यात झालेली विभागीय फेरी आणि आता मुख्य फेरी मिळून एफसी गोवा संघ सलग अकरा सामने अपराजित आहे.

किशोर पेटकर

Reliance Development League: एफसी गोवा संघाने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (RFDL) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना बुधवारी श्रीनिदी डेक्कन एफसीवर 3-0 असा शानदार विजय संपादला. स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवरील मुख्य फेरीतील सामना बंगळूर येथे झाला.

गोव्यात झालेली विभागीय फेरी आणि आता मुख्य फेरी मिळून एफसी गोवा संघ सलग अकरा सामने अपराजित आहे. श्रीनिदी डेक्कनविरुद्ध एफसी गोवा संघ विश्रांतीला दोन गोलने आघाडीवर होता. लीवन कास्तान्हा याने 16 व्या, तर माकन चोथे याने 27 व्या मिनिटास गोल केला. 89 व्या मिनिटास श्रीनिदी डेक्कनच्या एम. उमाशंकर याला रेड कार्ड दाखविण्यात आले. त्यानंतर 90 + 01 व्या मिनिटास व्हर्स्ली पेस याने एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.

एफसी गोवा संघ राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या बंगळूर गटात खेळत आहे. या गटातील अन्य एका सामन्यात केरळा ब्लास्टर्सने लिफ्फा त्रिवेंद्रम संघाला नमविले. एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना 29 एप्रिल रोजी बंगळूर फुटबॉल स्टेडियमवर खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

Horoscope 14 Oct 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! 'या' 5 राशींचं चमकणार नशीब; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT