Football  Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाचा पंचतारांकित विजय

तासा गोवा 20 वर्षांखालील स्पर्धेत पणजी फुटबॉलर्सचा 5-1 फरकाने धुव्वा

दैनिक गोमन्तक

पणजी : एफसी गोवा संघाने शुक्रवारी जीएफए तासा गोवा 20 वर्षांखालील प्रथम विभागीय फुटबॉल स्पर्धेत पंचतारांकित विजयाची नोंद केली. त्यांनी पणजी फुटबॉलर्सचा 5-1 फरकाने धुव्वा उडविला. सामना साल्वादोर द मुंद पंचायत मैदानावर झाला. (FC Goa wins in Tasa Goa football tournament)

एफसी गोवाच्या विजयात जोवियल डायसने दोन, तर रायन मिनेझिस, मेव्हन डायस व डेव्हिस फर्नांडिस यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यांनी सर्व गोल उत्तरार्धातील खेळात नोंदविले. पणजी फुटबॉलर्सचा एकमात्र गोल रोहन भोसले याने केला.

सामन्यातील पहिला गोल 51व्या मिनिटास रायन मिनेझिसने डेल्झान पासान्हा याच्या असिस्टवर हेडिंगद्वारे केला. 57व्या मिनिटास मेव्हन डायसने संघाची आघाडी वाढविली. दोन सामन्यांतील त्याचा हा चौथा गोल ठरला. 68व्या मिनिटास जोवियल डायसने रिबाऊंडवर अचूक नेम साधला. पणजी फुटबॉलर्सने 73व्या मिनिटास पिछाडी कमी केल्यानंतर जोवियलने आणखी एक गोल नोंदवून एफसी गोवाची आघाडी 4-1 अशी भक्कम केली. सामन्याच्या भरपाई वेळेत डेव्हिस फर्नांडिसने संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

एफसी गोवाने स्पर्धेतील दोन सामन्यांत तब्बल नऊ गोल केले असून फक्त एक गोल स्वीकारला आहे. त्यांचा पुढील सामना चर्चिल ब्रदर्सविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT