FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa : एफसी गोवाची ड्युरँड मोहीम उद्यापासून

गतवर्षी कोलकाता येथेच एफसी गोवाने मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबला एका गोलने हरवून प्रथमच ड्युरँड कप विजेतेपद मिळविले होते.

किशोर पेटकर

FC Goa : ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतील गतविजेत्या एफसी गोवा संघाची मोहीम कोलकाता येथे मंगळवारपासून (ता. 16) सुरू होईल. अ गट साखळी फेरीतील त्यांचा पहिला सामना गतउपविजेत्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबविरुद्ध होईल.

गतवर्षी कोलकाता येथेच एफसी गोवाने मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबला एका गोलने हरवून प्रथमच ड्युरँड कप विजेतेपद मिळविले होते. यंदा त्यांचा मुख्य संघ सहभागी होत नसून नवोदितांवर जबाबदारी असेल. डेगी कार्दोझ या संघाचे प्रशिक्षक असून गतमोसमात डेव्हलपमेंट लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मध्यरक्षक लेस्ली रिबेलो संघाचा कर्णधार आहे.

एफसी गोवाचा गटसाखळीतील दुसरा सामना 19 ऑगस्टला इंडियन एअर फोर्सविरुद्ध होईल, नंतर 26 ऑगस्टला जमशेदपूर एफसीविरुद्ध, तर 30 ऑगस्टला बंगळूर एफसीविरुद्ध ते खेळतील. ‘‘गतविजेते या नात्याने स्पर्धेत खेळताना अतिरिक्त दबाव घेणार नाही. करंडक जिंकण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायचे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे आणि त्यादृष्टीनेच आम्ही तयारी केली आहे. संघाची चांगली बांधणी आहे आणि क्षमता सिद्ध करण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत,’’ असे कार्दोझ यांनी कोलकात्यास रवाना होण्यापूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT