Independence Day : पणजीत स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन

कदंब महामंडळ, केंद्रीय दूरसंचार विभाग आणि गोवा सरकार यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
75th Independence Day Goa
75th Independence Day Goa

Independence Day : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील बस स्थानकात स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्र प्रदर्शनास शुक्रवारी प्रारंभ झाला. कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कदंब महामंडळ, केंद्रीय दूरसंचार विभाग आणि गोवा सरकार यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बहुमोल योगदान दिले, त्यांची सचित्र माहितीही या प्रदर्शनाद्वारे लोकांना व्हावी, हा प्रदर्शनाचा उद्देश आहे. तुयेकर म्हणाले की, या प्रदर्शनाच्या माध्यमातून युवा पिढीला स्वातंत्र्यसैनिकांची माहिती मिळणार आहे. आम्ही भाग्यवान आहोत, की देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

75th Independence Day Goa
Ganesh Chaturthi : काणकोणमध्ये 20 तारखेपासून भरणार स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार

नुकसान सोसूनही सेवा देणार

तोट्यात असूनही कदंब महामंडळ लोकांना सेवा देत आहे. नुकसान हाेते म्हणून ग्रामीण भागातील सेवा बंद करून चालणार नाही. सध्या महामंडळाकडे 50 इलेक्ट्रिक बसेस आल्या असून आणखी 160 बसेस येणार आहेत. या बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू झाले आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com