Sandesh Jhingan Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football : यशासाठी सारेजण भुकेलेले : झिंगन

एफसी गोवा करारामुळे सहकारी उदांतासह पुन्हा एकत्रित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Football : एफसी गोवा संघ सध्या खूप मेहनत घेत असून सारे खेळाडू यशासाठी भुकेलेले आहेत आणि ते सुचिन्ह असल्याचे मत या संघाचा नवा बचावपटू संदेश झिंगन याने व्यक्त केले. भारतीय फुटबॉल संघाचे प्रमुख आधारस्तंभ संदेश झिंगन आणि उदांता सिंग आता एफसी गोवाच्या करारामुळे पुन्हा एकत्रित खेळताना दिसतील.

भारताने बंगळूर येथे सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा जिंकली, त्यावेळी या दोघांची कामगिरी लक्षवेधी ठरली होती. राष्ट्रीय संघाच्या यशस्वी मोहिमेनंतर गतआठवड्यात झिंगन व उदांता एफसी गोवाच्या साल्वादोर द मुंद पंचायत मैदानावरील सराव शिबिरात सहभागी झाले.

‘‘तुम्ही जिंकता आणि नंतर व्यावसायिक आयुष्यात नव्या आव्हानाची सुरवात करता तेव्हा आनंद वाटणे साहजिकच आहे. माझ्या कामगिरीबद्दल समाधानी आहे आणि एफसी गोवातर्फे सातत्य कायम राखण्याबाबत मी आशावादी आहे,’’ असे संदेशने सांगितले.

भारताचे प्रतिनिधित्व करताना जूनमध्ये इंटरकाँटिनेंटल कप, नंतर सॅफ अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना संपूर्ण संघाचे जिंकणे हेच समान उद्दिष्ट होते, अथक परिश्रम घेत आम्ही एकमेकांना साथ दिली, असे संदेश म्हणाला.

आता पुन्हा एफसी गोवा संघात एकत्रित येताना खूप आनंद वाटत असल्याचे संदेशने नमूद केले. प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघ नव्या मोसमासाठी परिश्रम घेत आहे.

या पार्श्वभूमीवर, ‘‘यशासाठी आम्ही सर्वजण भुकेले आहोत हे सिद्ध होते आणि ते सुचिन्ह आहे. आम्ही एका चांगल्या मोसमाचा आनंद लुटू याची खात्री वाटते,’’ असे संदेश आगामी मोसमाविषयी म्हणाला.

यशस्वी साथ

आयएसएल स्पर्धेत संदेश झिंगनने २०१४ साली केरळा ब्लास्टर्सतर्फे, तर उदांता सिंगने २०१७-१८ मध्ये बंगळूर एफसीतर्फे पदार्पण केले. नंतर दोघेही बंगळूर एफसी संघात सहकारी बनले. गतमोसमात त्यांनी ड्युरँड कप जिंकला, तसेच आयएसएल व सुपर कपमध्ये विजेतेपद मिळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unlucky Zodiac Signs: अंगारक योगामुळे वाढणार अडचणी; 'या' तीन राशींनी कर्ज, गुंतवणूक आणि मोठे व्यवहार टाळावेत

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! तक्रारी निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

Bastora Fire Incident: मुले शाळेत, आई-वडील कामावर अन् मागे सगळंच संपलं! सोन्याचे दागिने, कपडे अन् अन्नधान्य जळून खाक; दुर्घटनेत कुटुंबाचे नुकसान

SCROLL FOR NEXT