FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवास प्रतिकूलतेचा फटका ः डेरिक

भरपूर नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याचे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी शनिवारी नमूद केले.

दैनिक गोमन्तक

FC Goa: एफसी गोवासाठी इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेचा आठवा मोसम निराशाजनक ठरला. त्या अनुषंगाने संघास यावेळी प्रतिकूल बाबींचा फटका बसला आणि त्याद्वारे भरपूर नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याचे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी शनिवारी नमूद केले.

‘‘आमच्यासाठी संपूर्ण मोसम वळणांचा, शिकण्याचा ठरला. वैयक्तिकदृष्ट्या, जैवसुरक्षा वातावरण प्रथमच अनुभवले. खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य आणि त्याचे महत्त्व समजू शकलो. मोसमात बऱ्याच घटकांचा आमच्या निकालावर प्रतिकूल परिणाम झाला. काही वेळा आम्हाला ऐनक्षणी अकरा सदस्यीय संघात बदल करावा लागला. काही दिवस आम्ही सरावासाठी बाहेर पडू शकलो नाही. केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर सामन्यात पंचगिरी करणाऱ्यांच्या चुकांमुळे काही सामन्यांत नुकसान झाले. थोडक्यात, आम्ही भरपूर काही करू शकलो असतो. आता आम्हाला चांगल्या टप्प्यावर मोसम संपवायचा आहे,’’ असे संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना डेरिक म्हणाले.

केरळा ब्लास्टर्सला उपांत्य फेरीचे वेध

केरळा ब्लास्टर्सला आठव्या आयएसएल स्पर्धेत उपांत्य फेरीचे वेध लागले आहेत. नवव्या क्रमांकावरील एफसी गोवाविरुद्ध त्यांची रविवारी (ता. 6) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर लढत होईल. केरळा ब्लास्टर्सने 19 लढतीत नऊ विजय, सहा बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह 33 गुण नोंदवत चौथा क्रमांक मिळविला आहे. एफसी गोवास यंदा स्पर्धेत फक्त चार सामनेच जिंकता आले. सहा बरोबरी व नऊ पराभव अशा कामगिरीसह त्यांच्या खाती 19 लढतीतून फक्त 18 गुण आहेत.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एफसी गोवा (FC Goa) व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना 2-2 गोलबरोबरीत राहिला होता. उभय संघात आयएसएलमध्ये 15 लढती झाल्या आहेत. त्यात एफसी गोवाने नऊ, तर केरळा ब्लास्टर्सने तीन विजय नोंदविले असून तीन लढती बरोबरीत राहिल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, नोव्हेंबर 2016 पासून आयएसएलमधील (ISL) नऊ लढतीत केरळा ब्लास्टर्सला एफसी गोवाविरुद्ध जिंकता आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण!देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

SCROLL FOR NEXT