FC Goa : Kunal Kundaikar Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa : कुणालचा चाहता ते खेळाडू प्रवास

FC Goa : 22 वर्षीय खेळाडू स्पोर्टिंग क्लब द गोवाकडून तीन वर्षांसाठी करारबद्ध

किशोर पेटकर

पणजी ः एफसी गोवा (FC Goa) संघाचा चाहता ते या संघाचा खेळाडू हा प्रवास बचावपटू कुणाल कुंडईकर (Kunal Kundaikar) याच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे. इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉलमधील माजी लीग शिल्ड विजेत्यांनी बुधवारी 22 वर्षीय खेळाडू तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. कुणालला एफसी गोवाने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाकडून करारबद्ध केले आहे. त्यासाठी रक्कम मोजावी लागली, पण नेमकी किती हे एफसी गोवाने जाहीर केलेले नाही. गतमोसमात गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धा जिंकलेल्या स्पोर्टिंग क्लब संघात कुणालने महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता. तो मोसमातील सर्वोत्तम बचावपटू ठरला होता.

‘‘मी एफसी गोवा संघाचा निस्सीम चाहता आहे. या संघाचे सामने पाहण्यासाठी मी फातोर्ड्यात (पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम) कितीतरी वेळा गेलेलो आहे. आता मला या संघातील आदर्श असलेल्या खेळाडूंसमवेत प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची संधी मिळत आहे. माझी ही स्वप्नपूर्तीच आहे,’’ असे मत कुणालने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘कुणालच्या गुणवत्तेने आम्हाला प्रभावित केले आहे, त्यामुळेच काही काळ तो आमच्या रडारवर होता. या युवा गोमंतकीय फुटबॉलपटूचे भवितव्य उज्ज्वल आहे. बचावफळीतील कौशल्यासह त्याच्यापाशी पासिंगचीही चांगली क्षमता आहे. आमच्यासोबत त्याला प्रगती साधताना पाहायचे आहे,’’ असे कुणालविषयी एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले. स्पॅनिश खेळाडू सर्जिओ रामोस याला आदर्श मानणारा कुणाल सुरवातीस विंगर होता, त्यानंतर त्याने बचावपटू या नात्याने गोमंतकीय फुटबॉलमध्ये ठसा उमटविला. आता त्याला आगामी आयएसएल स्पर्धेपूर्वी एफसी गोवाच्या मोसमपूर्व सरावात मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांचा विश्वास संपादन करण्याची संधी लाभेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT