Manolo Marquez Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa आयएसएलमधील सर्वात धोकादायक संघ ठरेल : मार्केझ

कोणत्याही प्रतिस्पर्ध्यास हरविण्याची क्षमता

दैनिक गोमन्तक डिजिटल

ISL : आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा धोकादायक संघ ठरेल, असे भाकीत व्यक्त करताना या संघाने नवे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी प्रतिस्पर्धांना इशाराही दिला.

आयएसएल स्पर्धेतील कोणत्याही संघाला हरविण्याची क्षमता एफसी गोवा संघात असल्याचा विश्वास 54 वर्षीय मार्केझ यांनी मंगळवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘सामना घरच्या मैदानावर असो वा बाहेरगावी, आयएसएल स्पर्धेतील कोणत्याही संघाला एफसी गोवा पराभूत करू शकेल. ज्या बाबी अगोदरच उपलब्ध आहेत, त्यात प्रगती साधत यावर्षी अतिशय तुल्यबळ संघ बांधणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अर्थातच विजेतेपद हेच आमचे लक्ष्य राहील.’

एफसी गोवा संघाला गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत सातवा क्रमांक मिळाला, आता २०२३-२४ मोसमापूर्वी हैदराबाद एफसीच्या माजी मार्गदर्शकाकडे एफसी गोवा संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

इतर संघही मातब्बर

स्पॅनिश मार्केझ यांनी हैदराबाद एफसीचे तीन वर्षे प्रशिक्षकपद भूषविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ २०२१-२२ मोसमात आयएसएल करंडक विजेता ठरला. ते म्हणाले, ``पहिल्या वर्षी मला भारतीय फुटबॉलबद्दल जास्त माहिती नव्हती, मात्र त्यानंतर मी नव्या मोसमापूर्वी संघ कशी तयारी करतात आणि मातब्बर आव्हान देतात हे जाणले आहे.

एफसी गोवाचे उदाहरण घेऊ, अगोदरच्या वर्षी नवव्या क्रमांकावर घसरण होऊनही त्यांनी संपूर्ण २०२२-२३ मोसमात पहिल्या सहा संघांत जागा राखण्यासाठी प्रयत्न केले. माझं वैयक्तिक मत आहे, भारतीय फुटबॉलमध्ये मुंबई सिटी आणि मोहन बागान हे संघ बार्सिलोना आणि रेयाल माद्रिदप्रमाणे असून तुलनेत सरस आहेत. तथापि, इतर संघही खूप दूर नाहीत. ते तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. गतमोसमात फक्त तळाचे दोन संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत नव्हते. यावरून चुरस लक्षात येते.``

आता नव्याने सुरवात

एफसी गोवाची मागील कामगिरी नजरअंदाज करताना मार्केझ यांनी, आता आपल्यासाठी नवा अध्याय, नवी जबाबदारी असून पूर्णपणे नव्याने सुरवात करत असल्याचे नमूद केले. युवा विकासाला प्राधान्य आणि आक्रमक फुटबॉल हे एफसी गोवाचे तत्त्वज्ञान आहे, इतर संघही त्याचे अनुकरण करण्यास इच्छुक असतात, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT