FC Goa first win under the guidance of Derrick Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाचा डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला विजय

चेन्नईयीनला नमविले; ओर्तिझचा प्रेक्षणीय गोल निर्णायक

दैनिक गोमन्तक

पणजी: सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना स्पॅनिश स्ट्रायकर होर्गे ओर्तिझ याचा ‘लाँग रेंजर’ फटका भेदक ठरला व या निर्णायक गोलमुळे एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या आठव्या मोसमात डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला विजय नोंदविला. बांबोळी (Bambolim) येथील ॲथलेटिक स्टेडियमवर शनिवारी रात्री त्यांनी माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला 1-0 फरकाने हरविले.

एफसी गोवाने (FC Goa) चार लढतीनंतर विजय मिळविला. 11 डिसेंबर 2021 रोजी बांबोळी येथे बंगळूर एफसीला 2-1 फरकाने हरविल्यानंतर एफसी गोवाने तीन बरोबरी व एक पराभव अशी कामगिरी केली होती. डेरिक यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन लढतीत एफसी गोवाने दोन बरोबरी व एक पराभव पत्करला होता. ओर्तिझच्या गोलमुळे रविवारी रात्री त्यांना प्रशिक्षक या नात्याने विजय नोंदविता आला.

एफसी गोवाचा हा 10 लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता 12 गुण झाले असून ते आठव्या स्थानी आले आहेत. चेन्नईयीनला चौथा पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे 10 लढतीनंतर त्यांचे 14 गुण आणि सहावा क्रमांक कायम राहिला. चेन्नईयीनला चार लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला.

एफसी गोवाची आघाडी

स्पॅनिश आघाडीपटू होर्गे ओर्तिझ याने एफसी गोवास 82व्या मिनिटास यश मिळवून दिले. मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविल्यानंतर या 29 वर्षीय स्ट्रायकरने दूरवरून मारलेल्या ताकदवान फटक्यावर चेन्नईयीनचा गोलरक्षक देबजित मजुमदार याला सपशेल चकविले. ओर्तिझ याचा हा यंदाचा चौथा, तर आयएसएलमधील एकंदरीत दहावा गोल ठरला. त्यापूर्वी, सामन्याच्या पन्नासाव्या मिनिटास एदू बेदियाचे थेट कॉर्नर फटक्यावर गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली. सेटपिसवरील जोरदार फटक्यावर चेन्नईयीनचा गोलरक्षक देबजित मजुमदार व खेळाडू रीगन सिंग यांचा अंदाज चुकला, पण चेंडू गोलपोस्ट धडकल्यामुळे नुकसान झाले नाही.

पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत

पूर्वार्धातील 45 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल नोंदविता आला नाही. एफसी गोवाचा स्पॅनिश होर्गे ओर्तिझ त्रास देणार नाही यावर चेन्नईयीनचा भर राहिला. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत चेन्नईयीनचा गोलरक्षक देबजित मजुमदार याची चूक एफसी गोवाच्या पथ्यावर पडू शकली नाही. एदू बेदिया याचा कॉर्नर फटका देबजितने थोपवला, पण चेंडू एफसी गोवाचा खेळाडू ऐबान डोहलिंग याच्या ताब्यात गेला. गोलसमोर त्याला संधी होती, फटका दिशाहीन ठरल्यामुळे गोलरक्षकाच्या चुकीचा फटका चेन्नईयीनला बसला नाही. त्यापूर्वी 39व्या मिनिटास देबजितने ओर्तिझचे आक्रमण उधळून लावत संघावरील संकट टाळले होते.

अन्वर, नवीनला प्रथमच संधी

एफसी गोवा संघात शनिवारी दोघा खेळाडूंनी प्रथमच जागा मिळविली. मागील काही सामन्यांत सेटपिसवर, तसेच लाँग रेंजर फटक्यावर कमजोर कामगिरी केलेल्या गोलरक्षक धीरज सिंग याच्या जागी नवीन कुमार याला संधी मिळाली. बचावपटू अन्वर अली याने एफसी गोवातर्फे आयएसएल पदार्पण केले. यंदाच्या मोसमात जमशेदपूर एफसीकडून सहा सामने खेळलेल्या लिथुआनियाच्या नेरियूस व्हाल्सकिस याने चेन्नईयीन एफसी संघात पुनरागमन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT