FC Goa
FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa: अपेक्षित कामगिरी होत नसल्याने एफसी गोवाचे प्रशिक्षक विचारमग्न

दैनिक गोमन्तक

FC Goa: एफसी गोवाची बचावफळी खूपच कमजोर आहे. प्रशिक्षक डेरिक परेरा यांच्यासाठी सध्या हीच डोकेदुखी असून माजी विजेत्या बंगळूर एफसीचे आक्रमण रोखण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घ्यावी लागेल. बंगळूरचा संघ सलग पाच सामने अपराजित आहे.

बंगळूर एफसी व एफसी गोवा (FC Goa) यांच्यात आठव्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील सामना आज (शनिवारी) खेळला जाईल. दोन्ही संघांची कामगिरी समान असून त्यांचे प्रत्येकी 13 गुण आहेत. दोन्ही संघ अजूनही सर्वोत्तम कामगिरीच्या शोधात आहे.

एफसी गोवा सेटपिसेसवर कमजोर

अगोदरच्या लढतीत बचावफळीतील अतिशय कमजोर खेळामुळे एफसी गोवाने ईस्ट बंगालला दोन गोल बहाल केले आणि पराभवासही निमंत्रण दिले. त्यांनी स्पर्धेत सध्या 21 गोल स्वीकारले आहेत. गोलरक्षक धीरज सिंग यानेही अजूनपर्यंत 11 सामन्यांत क्लीन शीट राखलेली नाही. एफसी गोवाने फक्त एकाच सामन्यात गोल न स्वीकारता विजय मिळविला, त्यावेळी चेन्नईयीविरुद्ध नवीन कुमारने गोलरक्षण केले होते. सेट पिसेसवर एफसी गोवाचा बचाव कोलमडतो. या व्यूहरचनेत त्यांनी 11 गोल स्वीकारले असून त्यापैकी 7 गोल फ्रीकिक फटक्यावरील आहेत. या संघाला सदोष नेमबाजीही सतावत आहे. प्ले-ऑफ गाठणे हेच आमचे सुरवातीपासून लक्ष्य होते, त्यामुळे आमच्यावरील दबाव वाढला, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी नमूद केले.

बंगळूर विलगीकरणातून मैदानात

बंगळूरचा एटीके मोहन बागानविरुद्धचा मागील सामना वैद्यकीय कारणास्तव झाला नव्हता. त्यापूर्वी मार्को पेझ्झायोली यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने गतविजेत्या मुंबई सिटीचा 3-0 फरकाने धुव्वा उडविला होता. बंगळूरलाही बचावफळीतील त्रुटी सतावत असून त्यांनीही 18 गोल स्वीकारले आहेत. मागील पाच सामन्यात त्यांनी 2 विजय व 3 बरोबरीची नोंद केली आहे. कोविड-19 शक्यतेमुळे दहापेक्षा जास्त दिवस हॉटेलमध्ये विलगीकरणात राहिल्यानंतर ते सरावास उतरले असून सामन्यासाठी सज्ज होत आहेत.

मैदानात उतरण्यापूर्वी...

- बंगळूर एफसीचे 3 विजय, 4 बरोबरी, 4 पराभव

- एफसी गोवाचे 3 विजय, 4 बरोबरी, 5 पराभव

- बंगळूरचा +1, एफसी गोवाचा -5 गोलफरक

- पहिल्या टप्प्यात 11 डिसेंबर रोजी बांबोळी येथे एफसी गोवाची बंगळूरवर 2-1 फरकाने मात

- आमने-सामने 10 लढती, बंगळूरचे 5, तर एफसी गोवाचे 3 विजय, 2 लढती बरोबरीत

‘‘हा कठीण सामना असेल. सर्व काही बदलेल यावर विश्वास ठेवून आम्हाला मैदानात उतरावे लागले. युद्धभूमीवर धैर्य प्रदर्शित करावे लागते आणि क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज राहावे लागले.’’

- डेरिक परेरा (Derrick Pereira), प्रशिक्षक एफसी गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT