चर्चिल ब्रदर्सचे माजी मार्गदर्शक भौमिक यांचे निधन

गोव्यातील चर्चिल ब्रदर्सला तांत्रिक संचालक या नात्याने मार्गदर्शन केलेले सुभाष भौमिक यांचे कोलकात्यात आजारपणाने निधन झाले.
सुभाष भौमिक
सुभाष भौमिकDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: `भोम्बोल दा` या टोपणनावाने ओळखले जाणारे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू, ईस्ट बंगालचे सफल प्रशिक्षक, तसेच गोव्यातील चर्चिल ब्रदर्सला तांत्रिक संचालक या नात्याने मार्गदर्शन केलेले सुभाष भौमिक यांचे कोलकात्यात आजारपणाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते.

सुभाष भौमिक
TMC Star Campaigners: टीएमसीतर्फे 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पण...

ईस्ट बंगाल व मोहन बागान या कोलकात्यातील प्रमुख क्लबतर्फे ते स्ट्रायकर या नात्याने यशस्वी ठरले. 2 ऑक्टोबर 1950 रोजी जन्मलेल्या भौमिक यांनी 30 जुलै 1970 रोजी भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यांनी 24 वेळा भारताचे प्रतिनिधित्व करताना 9 गोल नोंदविले. 1971भारताने 5-1 फरकाने विजय प्राप्त केला.

सुभाष भौमिक यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने राष्ट्रीय साखळी स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. 2012-13 मोसमात त्यांनी चर्चिल ब्रदर्सचे तांत्रिक संचालकपद सांभाळले. चर्चिल ब्रदर्स क्लबने भौमिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. क्लबच्या ह्रदयात आणि टिळक मैदानावर सुभाष भौमिक यांचा आवाज नेहमीच गुंजत राहील. तांत्रिकदृष्ट्या ते सरस होते. फुटबॉलप्रती त्यांची उत्कटता सर्वोत्तम होती, असे चर्चिल ब्रदर्सने शोकसंदेशात नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com