CM Sawant
CM Sawant

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi In Goa: सावंत आणि तानावडे यांनी काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि रमाकांत खलप यांच्यावर सडकून टीका केली.

PM Modi In Goa

भाजपच्या गोव्यातील पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांच्या प्रचारार्थ सांकवाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. मोदींच्या भाषणापूर्वी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाषण केले. यावेळी सावंत आणि तानावडे यांनी काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि रमाकांत खलप यांच्यावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय म्हणाले?

रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांना गोव्यातील लोक घराचा रस्ता दाखतील. गोमन्तकीयांच्या कष्टाचे पैसे रामाकांत खलपांनी लुटले. खलपांनी राज्यातील साडेतीन लाख लोकांचे पैसे लुटले. काँग्रेसच्या काळातच घोटाळा झाल्याचे त्यांनीच मान्य केलंय, असे सावंत म्हणाले.

दोबाळी विमानतळावर राजकारण करण्याची गरज नाही, दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनच सुरु राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले.

एसटी आरक्षण, ओसीआय कार्डच्या समस्या मोदींच्या काळात सोडविण्यात आल्या, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. काँग्रेसने आजवर जातीचे राजकारण केले, उलट मोदींनी सर्वांना एकत्र घेऊन विकासाचे राजकारण केल्याचे सावंत म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे काय म्हणाले?

नौदलात काम केलेल्या विरियातो यांना राज्यघटनेबाबत आदर नसेल तर त्यांची काँग्रेसचा उमेदवार म्हणून उभं राहण्याची लायकी नाही. १९६१ साली गोव्यावर संविधान लादण्यात आले असे वक्तव्य विरियातो यांनी केले, त्यांनी संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांचा अनादर केला, असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.

विरियातो फर्नांडिस यांनी संविधान गोव्यावर लादले असे वक्तव्य केले ते रमाकांत खलप यांना मान्य आहे की नाही याबाबत त्यांनी खुलासा करावा, असे तानावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com