Derrick Pereira Dainik gomantak
क्रीडा

एफसी गोवाचे प्रशिक्षक डेरिक परेरा संघावर नाराज

या लढतीनंतर डेरिक यांनी निराशा व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

पणजी : एफसी गोवा (FC Goa) संघाची या मोसमात सोपे गोल स्वीकारण्याची सवय वेदना देणारी आहे, असे मत व्यक्त करत मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी कमजोर कामगिरीबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत बुधवारी रात्री सामन्यावर वर्चस्व राखूनही सातत्याने चुका केल्यामुळे एफसी गोवाला हार पत्करावी लागली. बचावफळीतील टाळण्याजोग्या त्रुटींमुळे नाओरेम महेश सिंग याने दोन गोल केले आणि त्या बळावर ईस्ट बंगालने 2-1 फरकाने स्पर्धेतील पहिला विजय नोंद केली. या लढतीनंतर डेरिक यांनी निराशा व्यक्त केली.

डेरिक म्हणाले, की ``आम्हाला त्यांचा बचाव मोडता आला नाही. आम्ही दोन सोपे गोल घेतले, विशेषतः बरोबरीनंतर. आम्ही बचावफळीत आणखी एक चूक केली आणि गोल स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपल्या क्षेत्रात खोलवर बचावावर भर दिला. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले, परंतु ते अपेक्षित निकालासाठी पुरेसे ठरले नाहीत. आमच्याविरुद्ध त्यांनी (ईस्ट बंगाल) चांगल्या पद्धतीने बचाव केला, यासाठी त्यांनाही श्रेय द्यायलाच हवे.``

संयम राखणे आवश्यक

सामन्यातील कामगिरीविषयी डेरिक यांनी सांगितले, की ``संपूर्ण सामन्यावर आम्ही वर्चस्व राखले. त्यांना आम्ही क्वचितच संधी दिली. दोन गोलचा अपवाद वगळता आमचेच खेळावर नियंत्रण होते. मला वाटतं, आम्ही आघाडीत गोलसमोर संयम राखणे आवश्यक होते. सामने जिंकणे हीच आमची मानसिकता असल्यामुळे घाई केली.``

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज, बाबूश यांच्‍या मनात आहे तरी काय?

रस्ता चुकला, गाडी चिखलात रुतली; मनालीतून गोव्याला येताना रशियन महिलेवर आले संकट, पोलिस, स्थानिक धावले मदतीला

Goa Live News: पुढील सहा महिन्यांत महामंडळाचे उत्पन्न वाढणार

Kadamba Bus: "दारू पिऊन बस चालवल्यास घरचा रस्ता दाखवणार" KTCचा आक्रमक पवित्रा; तुयेकरांनी दिले कठोर निर्देश

India vs Pakistan: Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? सामना रद्द करण्याच्या याचिकेवर Supreme Courtनं दिला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT