Indian Super league FC Goa vs Odisha
Indian Super league FC Goa vs Odisha Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super league: एफसी गोवासमोर ओडिशाचे तगडे आव्हान; उद्या महत्वाची लढत

Akshay Nirmale

Indian Super league FC Goa vs Odisha: एफसी गोवा संघाला फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर काहीही शक्य आहे, असे सांगत ओडिशा एफसीविरुद्धच्या पूर्वसंध्येला मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी आशावाद व्यक्त केला. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (ता. 10) एफसी गोवासमोर ओडिशा एफसीचे आव्हान असेल. यजमान संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसीने ओळीने तीन सामने जिंकले आहेत. एकंदरीत आठ सामन्यांतून त्यांचे 18 गुण असून ते अव्वल स्थानासाठी प्रयत्नशील आहेत. एफसी गोवाला लौकिकास साजेसा सातत्यपूर्ण खेळ करता आलेला नाही. स्पर्धेतील चांगल्या सुरवातीनंतर त्यांनी चार लढतीत तीन पराभव पत्करले आहेत. त्यापैकी सलग दोन पराभव अनुक्रमे बंगळूर व मुंबई सिटीविरुद्ध आहेत. सध्या एफसी गोवाचे आठ लढतीतून 12 गुण आहेत.

इतिहासाला महत्त्व देत नाही...

एफसी गोवाने ओडिशाविरुद्ध आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, पण कार्लोस पेनया त्यास महत्त्व देण्यास तयार नाहीत. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘मी इतिहासात डोकावत नाही. यंदा स्पर्धेतील मागील सामन्यात चुका झाल्या, त्या विसरून प्रगतीवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्हाला कामगिरीत सातत्य राखावेच लागेल. ओडिशा एफसी संघ आव्हानात्मक आहे. त्यांच्याबद्दल प्रतिस्पर्ध्यांना आदर आहे. मी आशावादी आहे. फातोर्डा येथे एफसी गोवास काहीही शक्य आहे.’’

बेदियाची उणीव भासणार

मुंबई सिटीविरुद्ध एफसी गोवाचा अनुभवी मध्यरक्षक एदू बेदिया याला रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे तो शनिवारी ओडिशाविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याविषयी पेनया म्हणाले, की ‘‘एदूची अनुपस्थिती आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. त्याच्या जागी कोण खेळणार हे अजून निश्चित केलेले नाही. पर्यायी खेळाडू आहेत. माझा संघातील सर्व खेळाडूंवर शंभर टक्के विश्वास आहे.’’

मैदानात उतरण्यापूर्वी...

- आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा व ओडिशा यांच्यात 6 लढती

- एफसी गोवाचे 4 विजय, 2 सामने बरोबरीत

- 2021-22 मोसमात दोन्ही लढतीत प्रत्येकी 1-1 गोलबरोबरी

- यंदा स्पर्धेत ओडिशाचे 15, तर एफसी गोवाचे 12 गोल

- दोन्ही संघांनी प्रत्येकी 11 गोल स्वीकारलेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT