Vhalshi Lake: व्हाळशी तळ्याची संरक्षक भिंत खचली, भिंतीला तडे; दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं दुरुस्तीची मागणी

Vhalshi Lake Protective Wall Damaged: शहरातील व्हाळशी येथील नैसर्गिक तळ्याची संरक्षक भिंत खचली असून, ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Vhalshi Lake Protective Wall Damaged
Vhalshi Lake Protective Wall DamagedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: शहरातील व्हाळशी येथील नैसर्गिक तळ्याची संरक्षक भिंत खचली असून, ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराला जवळपास वर्ष होत आले तरी संबंधितांचे अद्याप लक्ष गेलेले नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी ही भिंत नव्याने बांधावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्री तळेश्वर देवस्थानला लागून असलेल्या या तळ्याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. चतुर्थीच्या काळात वाड्यातील गणपती तसेच देवी (गौरी) यांच्या मूर्तींचे विसर्जन याच तळ्यात केले जाते. तसेच शेती-बागायतीसाठीही हे तळे उपयुक्त ठरत आहे.

तडा गेलेल्या भागाजवळ लहान मुले, महिला तसेच नागरिकांचा सतत वावर असतो. त्यामुळे वर्दळीच्या वेळी भिंत कोसळल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यावर्षी गणपती व गौरी विसर्जनावेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन धोकादायक परिसरात दोरखंड बांधून अडथळा निर्माण करण्यात आला होता. हा अडथळा अद्याप कायम आहे.

Vhalshi Lake Protective Wall Damaged
South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

सरकारने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने संरक्षक भिंतीचे काम हाती घ्यावे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तळेश्वर देवाच्या वर्धापनदिनापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी रामा (नाना) गाड यांच्यासह स्थानिकांनी केली आहे.

Vhalshi Lake Protective Wall Damaged
Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

२५ वर्षांपर्वीची भिंत!

तळ्याच्या एका बाजूला संरक्षक भिंतीला मोठा तडा गेला असून, ती खचली आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी या तळ्याच्या काठावर ही भिंत बांधण्यात आली होती. मात्र, देखभालीअभावी ती आता कमकुवत झाली आहे. मंदिराच्या बाजूला सुमारे पाच ते सहा मीटर लांबीच्या भिंतीला तडा गेला असून, ती धोकादायक स्थितीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com