Year Ending 2022: 'या' खेळाडुंनी 2022 मध्ये क्रिकेटला म्हटले अलविदा

न्यूझीलंड, वेस्ट इंडिजच्या प्रत्येक तीन क्रिकेटपटुंनी या वर्षात केली निवृत्तीची घोषणा
Cricketers retired in Year 2022
Cricketers retired in Year 2022Dainik Gomantak

Year Ending 2022: सन 2022 हे वर्ष खेळांसाठी महत्वाचे ठरले आहे. अनेक महत्वाच्या वर्ल्डकप स्पर्धा या वर्षात पार पडल्या. काही सुरू आहेत. तसेच अनेक खेळाडुंना या वर्षात निवृत्तीचीही घोषणा केली. कोणकोणत्या क्रिकेटटपटुंनी या वर्षात क्रिकेटला अलविदा म्हटले ते जाणून घेऊया.

Cricketers retired in Year 2022
INDW vs AUSW: पदार्पण करताच अंजलीने रचला इतिहास! 'हा' विक्रम करणारी पहिलीच भारतीय

भारतीय क्रिकेटबाबत बोलायचे तर भारताच्या सुरेश रैना याने टी-20 प्रकारातून निवृत्ती घतेली. तर रॉबिन उत्थप्पा आणि राहुल शर्मा यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

या वर्षात जानेवारीत पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीज याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हाफीजने 2003 मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बांग्लादेशचा मुशफिकर रहीम याने टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिस यानेही क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. तो दहा वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेट खेळत होता. त्याने आयपीएल स्पर्धाही गाजवली होती. श्रीलंकेचा रंगेल खेळाडू दानुष्का गुनाथिलाका याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीलंकेच्याच सुरांगा लकमल यानेही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती स्विकारली. तो 2009 पासून श्रीलंकन संघासाठी क्रिकेट खेळतो आहे.

Cricketers retired in Year 2022
Shadab Khan: 'शादाबने मॅच हरवली', माजी लष्करप्रमुखांचा आरोप; पाक खेळाडूने दिले हे उत्तर

इंग्लंडच्या टीम ब्रेस्नन याने 2006 ते 2022 असा दीर्घकाळ क्रिकेट खेळले आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. याशिवाय इंग्लंडच्या इऑन मॉर्गन हा 2006 पासून इंग्लंडसाठी खेळत होता, त्यानेही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनेही एकदिवसीय सामन्यांतून निवृतती घेतली आहे. तो 2011 राष्ट्रीय संघासाठी खेळत होता.

न्युझीलंडच्या रॉस टेलर, हामिश बेनेट्ट, कॉलिन डी ग्रँडहोम यांनी या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. पैकी रॉस टेलर 2006 पासून, बेनेट्ट 2010 पासून तर ग्रँडहोम 2012 पासून न्युझीलंडसाठी खेळत होते.

वेस्ट इंडिजच्या किएरॉन पोलार्ड, लेंडल सिमन्स आणि दिनेश रामदिन यांनी क्रिकेटपटुंनीही सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. ते आता क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या अॅरन फिंच यानेही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com