ISL football Dainik Gomantak
क्रीडा

ISL football: एफसी गोवा समोर 'जमशेदपूर'चे लोटांगण

मोठा पल्ला गाठण्याचे ब्रायसनचे ध्येय

दैनिक गोमन्तक

पणजी: इंडियन सुपर लीग ( ISL ) फुटबॉल सामन्यात बदली खेळाडू या नात्याने खेळताना ब्रायसन फर्नांडिस याने लक्षवेधक गोल केला. एफसी गोवा संघाच्या या युवा मध्यरक्षकाने आयएसएल स्पर्धेत प्रथमच चेंडूला गोलनेटची अचूक दिशा दाखविण्यात यश मिळविले.

(fc goa beat jamshedpur fc in indian super league football match )

एफसी गोवाने गुरुवारी रात्री जमशेदपूर एफसीला 3-0 फरकाने हरविले. त्याने इंज्युरी टाईममध्ये ब्रायसनने गोल केला. अन्य गोल अनुक्रमे इकेर ग्वार्रोचेना व नोआ सदावी यांनी केले. सावियर गामा याच्या पासवर 21 वर्षीय ब्रायसनने जमशेदपूरच्या बचावफळीस खिंडार पाडले. त्यामुळे त्याला आयएसएल स्पर्धेत प्रथमच गोल केल्याचा जल्लोष करता आला. आनंद व्यक्त करताना या मेहनती मध्यरक्षकाने अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचेही सांगितले.

गोलचा आनंद अवर्णनीय

आयएसएल स्पर्धेतील पहिलावहिला गोल अविस्मरणीय आहे. त्यामुळे झालेला आनंद अवर्णनीय आहे, शद्बांत सांगणे कठीण आहे, असे सामन्यानंतर ब्रायसन याने सांगितले. आयएसएल स्पर्धेत खेळण्याचे आणि गोल करण्याचे माझे खूप वर्षांचे स्वप्न होते, ते प्रत्यक्षात उतरले हीच भावना विलक्षण आहे. त्याचवेळी संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला याचाही खूप आनंद झालाय, असे ब्रायसन म्हणाला.

आई-वडिलांचा ऋणी

ब्रायसनला फुटबॉल कारकिर्दीत आई-वडिलांची मोलाची साथ लाभली आहे. सामना संपल्यानंतर त्याने थेट स्टँडमध्ये धाव घेत त्यांची भेट घेतली, त्यावेळी त्याला भावना अनावर झाल्या होत्या. आजपर्यंतच्या प्रवासात मला आई-वडिलांची मोलाची साथ लाभली, त्यामुळेच एवढा पल्ला गाठू शकलो, मी आई-वडिलांचा ऋणी आहे, त्यांच्या साक्षीने पहिला आयएसएल गोल केला. पाय जमिनीवरच ठेव असा सल्ला त्यांनी मला दिला, असे ब्रायसनने गोलचा आनंद आई-वडिलांसह साजरा केल्यानंतर सांगितले.

डेरिक परेरांचे मानले आभार

एफसी गोवाचे तांत्रिक संचालक डेरिक परेरा यांचा ब्रायसनच्या फुटबॉलमधील वाटचालीत बहुमुल्य वाटा आहे. डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने 2021-22 मोसमात आयएसएल पदार्पण केले. डेरिक यांनी ब्रायसनच्या गुणवत्तेवर विश्वास दाखविला, त्याला संधी दिली होती, त्यामुळे त्याने गुरुवारी रात्री सर्वप्रथम डेरिक यांना फोन केला व त्यांचे आभार मानले.

यावेळी संचालक डेरिक यांनी माझे अभिनंदन केले, तसेच कामगिरीत सातत्य राखत, स्वप्नांचा पाठलाग करत राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती ब्रायसन याने दिली. सहा वर्षांपूर्वी स्थानिक फुटबॉल स्पर्धेतील गुणवत्तेतील प्रभावित होऊन एफसी गोवाने ब्रायसनला सामावून घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: आढळले मृत डॉल्फिनचे पिल्लू

SCROLL FOR NEXT