FC Goa enter In Durand Cup 2023 Semifinals Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup Football: एफसी गोवाचा ‘स्थापनादिनी’ धडाकेबाज विजय; उपांत्य फेरीत प्रवेश

चेन्नईयीनला 4-1 फरकाने नमवून उपांत्य फेरीत प्रवेश

किशोर पेटकर

FC Goa Enter In Durand Cup 2023 Semifinals: एफसी गोवा संघाने ‘स्थापनादिनी’ धडाकेबाज विजय नोंदवत थाटात 132व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्यांनी चेन्नईयीन एफसीचा 4-1असा धुव्वा उडविला. उपांत्यपूर्व सामना शनिवारी संध्याकाळी गुवाहाटी येथे झाला.

एफसी गोवा संघाची स्थापना 26 ऑगस्ट 2014 रोजी झाली. स्थापना दिवस संस्मरणीय ठरविताना ड्युरँड कप स्पर्धेतील माजी विजेत्यांनी शनिवारी पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे साखळी फेरीत ओळीने तीन सामने जिंकलेल्या चेन्नईयीन एफसीचे यावेळच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

बिकाश युमनम याच्या गोलमुळे पाचव्या मिनिटास चेन्नईयीन एफसीने आघाडी प्राप्त केली. त्यानंतर एफसी गोवाने जोरदार खेळ केला. संघातील नवा परदेशी खेळाडू आयर्लंडचा कार्ल मॅकह्यू याने ३०व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला.

नंतर स्पॅनिश खेळाडू कार्लोस मार्टिनेझ याने ३७व्या मिनिटास लक्ष्य साधल्यामुळे विश्रांतीला गोव्यातील संघ २-१ असा आघाडीवर होता. एफसी गोवाच्या खाती सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये आणखी दोन गोलची भर पडल्यामुळे एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब झाले.

मोरोक्कन नोआ सदोई याने ९०+१व्या मिनिटास, तर बदली खेळाडू व्हिक्टर रॉड्रिग्ज याने ९०+३व्या मिनिटास एफसी गोवाच्या उपांत्य फेरीतील जागेवर शिक्कामोर्तब केले.

साखळी फेरीत दोन विजय व बरोबरी आणि शनिवारचा विजय यामुळे एफसी गोवा संघ स्पर्धेत सलग चार सामने अपराजित आहे. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर मुंबई सिटी एफसी आणि मोहन बागान सुपरजायंट्स यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.

परदेशी खेळाडू लक्षवेधक

स्पर्धेतील पहिल्या लढतीत हॅटट्रिक साधलेल्या नोआ सदोईने स्पर्धेत आता पाच गोल नोंदविले आहेत. याशिवाय स्पॅनिश खेळाडूंत कार्लोस मार्टिनेझने तीन, तर व्हिक्टर रॉड्रिगेझने दोन गोल केले आहेत.

आता पहिल्याच लढतीत आयर्लंडच्या कार्ल मॅकह्यू याने गोल नोंदविला. एकंदरीत नव्या मोसमाच्या सुरवातीस एफसी गोवाचे परदेशी खेळाडू लक्षवेधक ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT