FC Goa Team Announced For Durand Cup 2023 : ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरताना एफसी गोवा संघाने कर्णधारपदी अनुभवी ब्रँडन फर्नांडिसला कायम राखले आहे. 25 सदस्यीय संघात 23 वर्षांखालील सहा युवा खेळाडू असून पाच परदेशी खेळाडूंपैकी चार जण नवे आहेत.
एफसी गोवा संघ ड गटातील सर्व सामने गुवाहाटी खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना शिलाँग लाजाँग एफसीविरुद्ध मंगळवारी (ता. 8 ) खेळला जाईल. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध, तर 16 ऑगस्ट रोजी डाऊनटाऊन हिरोज एफसीविरुद्ध लढत होईल.
एफसी गोवा संघाने 2021 मध्ये ड्युरँड कप विजेतेपद पटकावले होते. यंदा स्पॅनिश मानोलो मार्केझ संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
संघात स्थानिक 9 खेळाडू
एफसी गोवा संघात स्थानिक नऊ खेळाडू असून डेव्हलपमेंट संघातून बढती मिळालेला रायन मिनेझिस या नवा चेहरा आहे. नव्याने करारबद्ध केलेल्या भारतीय खेळाडूंत रॉलिन बोर्जिस, उदांता सिंग, संदेश झिंगन, बोरिस सिंग, रेनियर फर्नांडिस यांचा समावेश आहे.
नोआ सदावीचा दुसरा मोसम
मोरोक्कोचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल नोआ सदावी याचा एफसी गोवातर्फे यंदा सलग दुसरा मोसम आहे. गतमोसमात एफसी गोवातर्फे त्याने २३ सामन्यांत ११ गोल व ९ असिस्ट अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
ड्युरँड कपसाठी निवडलेल्या संघातील बाकी चार खेळाडू नवे आहेत. यामध्ये स्पॅनिश कार्लोस मार्टिनेझ, व्हिक्टर रॉड्रिगेझ व ओदेई ओनाइंडिया, तसेच ऑस्ट्रेलियन पावलो रेट्रे हे खेळाडू आहेत.
एफसी गोवा संघ
गोलरक्षक : धीरज सिंग, अर्शदीप सिंग, ह्रतिक तिवारी.
बचावपटू : सॅनसन परेरा, संदेश झिंगन, लिअँडर डिकुन्हा, ओदेई ओनाइंडिया, बोरिस सिंग, सेरिटन फर्नांडिस, सावियर गामा, ऐबान्भा डोहलिंग, जय गुप्ता, रायन मिनेझिस.
मध्यरक्षक : रेनियर फर्नांडिस, ब्रँडन फर्नांडिस, आयुष छेत्री, उदांता सिंग, रॉलिन बोर्जिस, पावलो रेट्रे, व्हिक्टर रॉड्रिगेझ, ब्रायसन फर्नांडिस, मुहम्मद नेमिल.
आघाडीपटू : नोआ सदावी, कार्लोस मार्टिनेझ, देवेंद्र मुरगावकर.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.