World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 30 वा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा अफगाण गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली.
विशेषत: वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी. फारुकीने आज श्रीलंकेविरुद्ध एकूण 10 षटके टाकली. दरम्यान, त्याने 34 धावा देत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. या सामन्यादरम्यान 23 वर्षीय युवा वेगवान गोलंदाजानेही विशेष कामगिरी केली.
अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी विश्वचषकाच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याकडे मोहम्मद नबीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी होती, पण ती हुकली.
दरम्यान, विश्वचषक 2019 मध्ये मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी केली, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. त्याने फक्त 30 धावा देत चार विकेट घेतल्या होत्या. आता फारुकीने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धही शानदार गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या आहेत. मात्र, यादरम्यान त्याने 34 धावा दिल्या.
4/30 – मोहम्मद नबी – विरुद्ध श्रीलंका – कार्डिफ – 2019
4/34 – फजलहक फारुकी – विरुद्ध श्रीलंका – पुणे – 2023
4/38 – शापूर झद्रान – विरुद्ध स्कॉटलंड – ड्युनेडिन – 2015
फजलहक फारुकीच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत एकूण 26 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 26 डावांत 28.21 च्या सरासरीने 38 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धची (Sri Lanka) त्याची आजची गोलंदाजी ही त्याची वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.