Virat Kohli Had Given A Gift To Sachin Tendulkar
Virat Kohli Had Given A Gift To Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Fathers Day: वडिलांचे निधन होऊनही 'या' दिग्गजांची सोडले नाही क्रिकेटचे मैदान

दैनिक गोमन्तक

आज म्हणजेच 19 जून 2022 रोजी जगभरात लोक फादर्स डे (Fathers Day) साजरा करत आहेत तसेच फादर्स डे साजरा करून लोक वडिलांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. हा दिवस 1910 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली होती. बरेच लोक त्यांच्या वडिलांना भेटवस्तू देऊन किंवा त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे करून त्याच्यांबद्दल प्रेम व्यक्त करतात. (Fathers Day Even after the death of the father Sachin Tendulkar and Virat Kohli has not left the cricket field)

अशा स्थितीत क्रीडा जगतातील दिग्गजांनीही फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांना आदरांजली वाहिली आहे. काहींना या दिवशी त्यांच्या वडिलांची खूप आठवण येते कारण त्यांच्या वडिलांनी हे जग सोडले आहे. असे असूनही वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे अनेक खेळाडू आहेत आणि अशाच काही दिग्गजांबद्दल आज आपण जाणून घेणाक आहोत.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) कथा काही अशीच आहे. कोहलीच्या वडिलांचे 2006 मध्ये निधन झाले, त्यावेळी कोहली अवघा 18 वर्षांचाच होता. मात्र, कोहलीने वडील गेल्यानंतर जे केले ते प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहेत. विराट कोहलीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की वडिलांच्या जाण्यानंतर, त्याने आपल्या कुटुंबाला वचन दिले होते की तो देशासाठी खेळेल कारण विराटला मोठ्या स्तरावर खेळताना पाहण्याचे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते.

भारताचा माजी कर्णधाराचे वडील जाण्याने तो त्याच्या आयुष्यातील 'सर्वात प्रभावी' क्षण ठरला होता आणि तेव्हापासून त्याला कठीण काळात लढण्यास मदत मिळाली आहे. कोहलीच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्या दिवसांत कोहली दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळत होता, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोहली दुसऱ्या दिवशी वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

सचिन तेंडुलकरला सर्वजण क्रिकेटचा देव म्हणतात. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत आणि समर्पण दाखवले आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा तो वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनीच मैदानावर खेळायला परतला होता.

तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण राहिला होता. सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) वडिलांचे 1999 साली निधन झाले आणि त्यावेळी तो इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक सामना खेळत होता. संघ दोन सामने आधीच हारला होता आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सचिनला त्याच्या वडिलांबद्दल माहिती मिळाली होती, त्यानंतर तो लगेच भारतामध्ये परतला.

सचिनने त्याच्या प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्रात चार दिवसांनी इंग्लंडला गेल्या बद्दलचा उल्लेख केला आहे. कारण त्याने त्याच्या वडिलांना विचारले होते की त्यांना त्याच्याकडून काय हवे आहे आणि त्यामुळेच तो पुन्हा विश्वचषकात सहभागी होण्यासाठी गेला आणि तेथे पोहोचल्यानंतर त्याने केनियाविरुद्ध शतक झळकावून भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोन्ही दिग्गजांनी आपल्या एका निर्णयाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT