MS dhoni with Farah khan Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Is Best: स्पॉटबॉय सोबतही स्माइल देत क्लिक करतो फोटो

तो अजूनही मातीशी जुळला आहे. धोनी चेहऱ्यावर एक स्माइल देत सगळ्यांशीच फोटो काढतो.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. धोनी सध्या मुंबईत आहे आणि काही जाहिरातींचे शुटिंग करतो आहे. फराह खानला (Farah khan) त्याच्या एका शूटचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी मिळाली. या शूटिंग दरम्यान फराह खानने धोनीबरोबर इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना फराहने सांगितले की तीसुद्धा या दिग्गज क्रिकेटरची फॅन आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेही फराहनच्या व्हायरल होत असलेल्या या फोटोवर भाष्य केले आहे. या अ‍ॅड शूटच्या वेळी धोनी भारताच्या रेट्रो टीम जर्सीमध्ये दिसला. (Farah khan praises MS Dhoni for this reason)

धोनीबरोबर फोटो शेअर करताना फराहने लिहिले की, "धोनीच्या एका अ‍ॅड शूटला डायरेक्ट केले. तो एक खूप चांगला व्यक्ती आहे एकदम पंक्चुअल आहे. तो अजूनही मातीशी जुळला आहे. धोनी चेहऱ्यावर एक स्माइल देत सगळ्यांशी फोटो काढतो. एवढच नाही तर तो एखाद्या स्पॉटबॉय सोबतही छान स्माइल देत फोटो क्लिक करतो. म्हणूनच मी त्याची फॅन आहे. हा फोटो सुद्धा डब्बू रत्नानी यांनी घेतला आहे."

फराहच्या या फोटोवर रणवीर सिंगने कमेंटमध्ये 'धोनी बेस्ट आहे' असे लिहिले आहे. त्याच्या एक दिवस आधी रणवीर सिंगने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून धोनीबरोबर एक फोटो शेअर केला होता. चॅरिटी प्रॅक्टीस फुटबॉल सामन्यादरम्यान धोनी आणि रणवीर एकत्र खेळताना दिसले होते.

धोनी बेंचवर आणि रणवीर सिंग जमिनीवर बसला होता, हा फोटो शेअर करताना रणवीरने त्याला, 'नेहमीच मोठ्या भावाच्या पायाजवळ.' असे कॅप्शन दिले होते. धोनीची फॅन फॉलोविंग जगभर पसरली आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी लवकरच इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) दुसर्‍या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT