Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे कमबॅक, जपानवर आता वादळाचे संकट

भारताने स्पेनचा 3-0 (India beat Spain 3-0) असा पराभव करत जबरदस्त कमबॅक केले आहे. स्पर्धेवर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. जपानमध्ये सध्या चक्रीवादळ (Cyclone) धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारताने स्पेनचा 3-0 (India beat Spain 3-0) असा पराभव करत जबरदस्त कमबॅक केले आहे.
भारताने स्पेनचा 3-0 (India beat Spain 3-0) असा पराभव करत जबरदस्त कमबॅक केले आहे.Twitter/ @TheHockeyIndia
Published on
Updated on

टोकियो: टोकियोमध्ये (Tokyo) भारताच्या (India) कालच्या निराशाजनक कामगिरी नंतर मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी (Indian men's hockey) संघाने विजयाने सुरुवात केली आहे. भारताने स्पेनचा 3-0 (India beat Spain 3-0) असा पराभव करत जबरदस्त कमबॅक केले आहे.

या सामन्यात भारताने स्पेनला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. सामन्यात स्पेनला 8 पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यातील एकही पेनल्टी कॉर्नर त्यांना गोलमध्ये बदलता आला नाही. पहिल्या हाफमध्येच भारतीय संघाने बढत मिळवली, पहिल्या हाफमध्ये भारताकडून सिमरनजितसिंग याने 14 व्या तर रूपिंदर सिंगने 15 व्या मिनिटाला गोल केले. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही.

भारताने स्पेनचा 3-0 (India beat Spain 3-0) असा पराभव करत जबरदस्त कमबॅक केले आहे.
Tokyo Olympics 2021: हॉकीत भारताची विजयी सुरूवात

भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला 3-2 अशी धूळ चारल्यानंतर संघाला ऑस्ट्रेलियाकडून मोठा पराभव स्विकारावा लागला होता. परंतु स्पेनचा हरवत भारताने टोकियो ऑलिंपिकमध्ये जबरदस्त कमबॅक करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

भारतीय महिला हॉकीमध्ये मात्र भारताच्या पदरी निराशा आली आहे. यात जर्मनीने भारतीय महिला संघाला 2-0 अशी मात दिली आहे. याआधी वर्ल्ड नंबर वन टीम नेदरलँडने भारतीय महिला संघाला 5-1 असा पराभव केला.

कोरोना नंतर ऑलिंपिकवर वादळाचे संकट

टोकियो ओलिंपिकवर (Tokyo Olympics) संकटांची मालिका एकामागून एक अद्याप सुरुच आहे. कोरोनामुळे (Covid19) आधीच ही ओलिंपिक स्पर्धा होणार की नाही, अशा व्दिधा मनस्थितीत होती. पण अखेर स्पर्धा सुरु झाली असली तरी आता स्पर्धेवर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. जपानमध्ये सध्या चक्रीवादळ (Cyclone) धडकणार असल्याचे सांगण्यात आल्याने आधीच कोरोनाच्या संकटाने घाबरलेले खेळाडू आता वादळाच्या संकटाने चिंतेत पडले आहेत. परंतु जपान सरकाने खेळाडूंना याचा फटका बसणार नाही असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com