Argentinaसंघाच्या विजयानंतर जल्लोष करताना कोल्हापुरकर Dainik Gomantak
क्रीडा

Copa America Final: Argentinaच्या विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष

अर्जेंटिना (Argentina) संघाचा हा विजय ऐतिहासिक असुन, या विजयाची जगभरात चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

कोल्हापुरकरांचा नादच खुळा..हा व्हिडीओ पाहुन तुम्ही सुद्धा असच म्हणाल .मात्र यावेळी हा नाद आहे कोल्हापुरकरांच्या फुटबऑल प्रेमाचा. कोपा अमेरिका 2021 च्या अंतिम (Copa America 2021 Final) सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina) नेमारच्या (Neymar) ब्राझीलचा (Brazil) पराभव करत 28 वर्षांनंतर कोपा अमेरिका मध्ये दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर जगभरातील अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. असाच काहीसा आनंद कोल्हापुर मधल्या अर्जेटिना संघाच्या चाहत्यांमध्ये सुद्धा पहायला मिळाला. (Fans in Kolhapur started dancing after victory of Argentina)

आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर 1993 नंतर प्रथमच अर्जेंटिनाचा संघ प्रमुख विजेतेपद मिळवण्यात यशस्वी झाला आहे. त्यानंतर अर्जेंटिना संघाच्या कोल्हापुर मधील समर्थकांनी या आनंदात बेभान होत डान्स केल्याचे पहायला मिळते आहे. कोल्हापुरकरांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकुळ घालताना दिसतोय. यामध्ये हे अर्जेंटिना संघाचे चाहते हातात ट्रॉफी घेऊन शिट्या वाजवत आपला आनंद साजरा करताना दिसता आहेत.

दरम्यान, अर्जेंटिना संघाचा हा विजय ऐतिहासिक असुन, या विजयाची जगभरात चर्चा सुरु आहे. संघाने दोनदा मेस्सीच्या नेतृत्वात कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला परंतु दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण यावेळी मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आणि विजय मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT