Virat Kohli fan PTI
क्रीडा

IND vs AFG: इंदूरच्या स्टेडियममध्ये चाहत्यांचा स्टंट, सुरक्षा तोडून विराटला मारली मिठी; पोलिसांनी घेतलं ताब्यात

Virat Kohli Fan: अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान विराट क्षेत्ररक्षण करत असताना एक चाहता सुरक्षा भेदत थेट मैदानात आला होता.

Pranali Kodre

Fan detained for breaching security and hugging Virat Kohli during India vs Afghanistan 2nd T20I at Indore:

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची लोकप्रियता लपून राहिलेली नाही. त्याचे भारतातच नाही, तर जगभरात चाहते आहेत. अनेकदा याचा प्रत्येय देखील येतो. दरम्यान, त्याला भेटण्यासाठी चाहने वेगवेगळ्या गोष्टी आणि काही धोकादायक गोष्टी करतानाही दिसतात.

अशीच एक घटना रविवारी (14 जानेवारी) इंदूरला झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघातील दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान घडली. होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराटला भेटण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षा भेदत मैदानात प्रवेश केला होता.

झाले असे की विराट बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत असताना एक चाहता सुरक्षा तोडून अचानक मैदानात घुसला आणि त्याने जाऊन थेट विराट कोहलीला मिठी मारली. त्यावेळी लगेचच मैदानातील अधिकाऱ्यांनी त्याला बाजूला केले आणि मैदानातून बाहेर नेले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार त्या चाहत्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्याला तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये नेले.

पोलिसांनी माहिती दिली की या चाहत्याकडे सामन्याचे तिकीट होते आणि तो नरेंद्र हिरवाणी गेटमधून होळकर स्टेडियममध्ये पोहचला होता. तसेच तो विराटचा मोठा चाहता असल्याचा अंदाज आहे. त्याने प्रेक्षक गॅलरीच्या समोर असलेल्या कुंपनावरून उडी मारून विराटला भेटण्याच्या हेतूने मैदानात प्रवेश केला होता.

विराटचे 14 महिन्यांनी पुनरागमन

दरम्यान, रविवारी विराटने तब्बल 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून टी20 सामना खेळला होता.

विराटने पुनरागमनाच्या सामन्यात भारताकडून 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 16 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावांची खेळी केली. त्याने यशस्वी जयस्वालबरोबर अर्धशतकी भागीदारीही रचली.

या सामन्यात जयस्वालने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली, तर शिवम दुबेने 63 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 173 धावांचे लक्ष्य 15.4 षटकात पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून करिम जनातने 2 विकेट्स घेतल्या, तसेच फझलहक फारुकी आणि नवीन-उल-हक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वबाद 172 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नायबने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने 3 विकेट्स घेतल्या, तसेच अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT