Axar Patel: अक्षरचा T20 मध्ये 'डबल' धमाका! 'हा' रेकॉर्ड करणारा जडेजानंतरचा दुसराच भारतीय

IND vs AFG: अक्षर पटेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 2 विकेट्स घेण्याबरोबरच मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.
Axar Patel
Axar PatelX/BCCI
Published on
Updated on

India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore, Axar Patel Record:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात रविवारी (14 जानेवारी) इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याच सामन्यात भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

फलंदाजीला पोषक असलेल्या इंदूरमधील खेळपट्टीवर अक्षरने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात अवघ्या 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान, अक्षरने या दोन विकेट्स घेण्याबरोबरच टी20 क्रिकेट कारकिर्दीत 200 विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला. तो टी20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा भारताचा 11 वा खेळाडू ठरला आहे.

Axar Patel
IND vs AFG: एकाच सामन्यात रोहित शर्माने नोंदवला विश्वविक्रम अन् लाजिरवाणा रेकॉर्डही, वाचा सविस्तर

इतकेच नाही, तर अक्षरने टी20 क्रिकेट कारकिर्दीत आत्तापर्यंत 234 सामने खेळताना 200 विकेट्स घेण्याबरोबरच फलंदाजी करताना 2545 धावाही केल्या आहेत. त्यामुळे तो टी20 क्रिकेटमध्ये 2000 हून अधिक धावा आणि 200 विकेट्स घेणारा दुसराच भारतीय अष्टपैलू खेळाडू आहे.

यापूर्वी असा विक्रम केवळ रविंद्र जडेजाला करता आला आहे. 310 टी20 सामन्यांमध्ये 3382 धावा केल्या आहेत आणि 216 विकेट्स घेतल्या आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज (14 जानेवारी 2024 पर्यंत)

  • 336 विकेट्स - युजवेंद्र चहल

  • 302 विकेट्स - पियुष चावला

  • 301 विकेट्स - आर अश्विन

  • 288 विकेट्स - भुवनेश्वर कुमार

  • 284 विकेट्स - अमित मिश्रा

  • 260 विकेट्स - जसप्रीत बुमराह

  • 235 विकेट्स - हरभजन सिंग

  • 218 विकेट्स - जयदेव उनाडकट

  • 216 विकेट्स - रविंद्र जडेजा

  • 209 विकेट्स - हर्षल पटेल

  • 200 विकेट्स - अक्षर पटेल

Axar Patel
IND vs AFG: 6,6,6...शिवम दुबेचा रुद्रावतार! नबीविरुद्ध ठोकले सलग तीन गगनचुंबी षटकार, Video Viral

भारताचा विजय

दरम्यान, इंदूरला झालेल्या टी20 सामन्यात भारताकडून अक्षर व्यतिरिक्त अर्शदीप सिंगने ३ विकेट्स घेतल्या, तसेच रवी बिश्नोईने २ विकेट्स आणि शिवम दुबेने १ विकेट घेतली. त्यामुळे अफगाणिस्तानने 20 षटकात सर्वबाद 172 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नायबने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली.

त्यानंतर 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 15.4 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तसेच शिवम दुबेने नाबाद 63 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून करीम जनातने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच नवीन-उल-हक आणि फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com