Viswanathan Anand  Dainik Gomantak
क्रीडा

Birthday Special: भारताचे पहिले ग्रँडमास्टर ते वर्ल्ड चॅम्पियन, विश्वनाथन आनंदबद्दलचे खास फॅक्ट्स

बुद्धीबळात भारताचे नाव इतिहासात कोरणाऱ्या विश्वनाथन आनंद यांचा आज 54 वा वाढदिवस आहे.

Pranali Kodre

बुद्धीबळ म्हटलं तरी आपल्या समोर पहिले नाव येते ते म्हणजे विश्वनाथन आनंद. पाचवेळचे विश्वविजेते असलेले भारताचे दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी केवळ इतिहासात त्यांचे नावच कोरले नाही, तर भारतात बुद्धीबळ खेळण्यासाठी अनेकांना प्रोत्साहीतही केले. त्यांचा रविवारी (11 डिसेंबर) 54 वा वाढदिवस आहे.

Viswanathan Anand

विश्वनाथन आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 मध्ये तमिळनाडूमध्ये झाला. त्यांची आई बुद्धीबळपटू होती. त्यामुळे बुद्धीबळ खेळण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. त्यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून बुद्धीबळ खेळण्यात रस घेण्यास सुरुवात केली. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरूही ठरली.

आनंद यांचे वडील दक्षिण रेल्वेमध्ये नोकरीला होते. तसेच आनंद यांना एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे.

Viswanathan Anand

आनंद यांना 'विशी' आणि 'टायगर ऑफ मद्रास' अशा टोपन नावानेही ओळखले जाते. त्यांनी चेन्नईतील लोयोला कॉलेज, चेन्नई येथून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Viswanathan Anand

आनंद यांना लहान वयापासून यशाची चव चाखायला मिळाली होती. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी 1983 साली नॅशनल सब-ज्यूनियर चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते. त्यांनतर पुढच्याच वर्षी ते इंटरनॅशनल मास्टर्सचे विजेतेपद जिंकणारे सर्वात युवा भारतीय ठरले होते. त्याच्या पुढच्यावर्षी ते पहिल्यांदा नॅशनल चेस चॅम्पियन बनले.

Viswanathan Anand

साल 1987 मध्ये ते वर्ल्ड ज्यूनियर चेस चॅम्पियनशीप जिंकणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू ठरले. त्यानंतर एकवर्षाने त्यांनी शक्ती फायनान्स इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून ते भारताचे पहिले ग्रँडमास्टरही बनले.

त्यानंतर 2000 साली त्यांनी एफआयडीई वर्ल्ड चेस चॅम्पिटनशिप पहिल्यांदा जिंकली. त्यावेळी त्यांनी अलेक्झी शिरोव यांना अंतिम सामन्यात पराभूत केले होते.

Viswanathan Anand

त्यांच्या यशाचे बक्षीस म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांना 1991-92 साली भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (आताचा मेजर ध्यानचंद खेलरत्न) देण्यात आला होता. हा पुरस्कार जिंकणारे ते पहिलेच खेळाडू होते.

आनंद यांनी सहा वेळा चेस ऑस्कर देखील जिंकला आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून दरवर्षी सर्वोत्तम बुद्धीबळपटूला देण्यात येतो.आनंद यांना 1997, 1998, 2003, 2004, 2007 आणि 2008 साली हा पुरस्कार मिळाला आहे.

Viswanathan Anand

विशेष गोष्ट अशी की विश्वनाथन आनंद तमिळ आणि इंग्लिंश या भाषांबरोबरच फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश या भाषाही बोलू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT