England vs France: फ्रान्स सेमीफायनलमध्ये! इंग्लंडच्या विश्वविजयाच्या स्वप्नांचा गतविजेत्यांकडून चुरडा

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत फ्रान्सने इंग्लंडचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
France Football Team
France Football Team Dainik Gomantak

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत शनिवारी रात्री उशीरा उपांत्यपूर्व फेरीतील अखेरचा सामना इंग्लंड विरुद्ध गतविजेत्या फ्रान्स संघात पार पडला. या सामन्यात फ्रान्सने 2-1 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा विश्वविजयाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने फ्रान्सने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.

फ्रान्सकडून त्यांचा दिग्गज खेळाडू ऑलिव्हर गिरोडने सामन्याचा निर्धारित वेळ संपण्यात 12 मिनिटे शिल्लक असताना केलेला गोल निर्णायक ठरला. त्याच्या या गोलने फ्रान्सचे उपांत्य फेरीसाठीचे तिकीट बुक केले.

France Football Team
FIFA Viral Video: 'फिफा'मध्ये अमेरिकन पत्रकाराचा रहस्यमय मृत्यू; भावाने ढसाढसा रडत कतार सरकारवर केले गंभीर आरोप

अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही शेजारी संघ एकमेकांना तोडीची लढत देत होते. मात्र, फ्रान्सकडून ओरिलियॉन तशॉमेनीने सामन्याच्या 17व्या मिनिटालाच पहिला गोल केला होता. पण, त्यानंतरही इंग्लंडने चांगला खेळ दाखवला होता.

दुसऱ्या हाफमध्ये सुरुवातीलाच इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने 54व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली होती. या गोलसह त्याने इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याच्या वेन रुनीच्या 53 गोलची बरोबरी केली.

मात्र, ऑलिव्हर गिरोडने 78 मिनिटाला गोल करत फ्रान्सला पुन्हा आघाडी मिळवून दिली. नंतर ही आघाडी फ्रान्सने टिकवून ठेवली आणि सामनाही आपल्या नावावर केला. दरम्यान, 84 व्या मिनिटाला केनला पेनल्टीवर पुन्हा एकदा गोल करण्याची संधी होती. पण, त्याने मारलेला चेंडू क्रॉसबारच्या वरती लागला. त्यामुळे इंग्लंडचे विश्वविजयाचे स्वप्नही भंगले.

आता सलग दोन वेळ वर्ल्पकप जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी ब्राझील आणि इटली यांच्यानंतर फ्रान्सला आहे. ब्राझीलने 1962 साली आणि इटलीने 1938 साली असा पराक्रम केला होता.

दरम्यान, फ्रान्सचा उपांत्य फेरीतील सामना मोरोक्को विरुद्ध होणार आहे. मोरोक्कोने पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का दिला असून तो पहिलाच आफ्रिकन संघ आहे, ज्यांनी फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता मोरोक्को विरुद्ध फ्रान्स यांच्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार 15 डिसेंबरला रात्री 12.30 वाजता सुरू होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com