Manchester City beat Chelsea 4-0 in FA Cup Dainik Gomantak
क्रीडा

FA Cup: मँचेस्टर सिटीकडून आठवड्यात दुसऱ्यांदा चेल्सीला एकतर्फी पराभवाचा धक्का

मँचेस्टर सिटीने एफए कपमध्ये चेल्सीला एकतर्फी पराभूत केले आहे.

Pranali Kodre

Manchester City vs Chelsea: एफए कपच्या तिसऱ्या फेरीत रविवारी इतिहाद स्टेडियमवर चेल्सी विरुद्ध मँचेस्टर सिटी यांच्यात सामना पार पडला. दरम्यान मँचेस्टर सिटीने चेल्सीचा 4-0 असा पराभव केला. गेल्या आठवड्याभरातील मँचेस्टर सिटीकडून झालेला चेल्सीचा हा दुसरा पराभव आहे.

या विजयासह मँचेस्टर सिटीने एफए कपच्या चौथ्या फेरीत सलग 11 व्यांदा धडक मारली आहे. मात्र गेल्या 25 हंगामात पहिल्यांदाच चेल्सीला एफए कपच्या चौथ्या फेरीत पोहचण्यासाठी अपयश आले आहे. तसेच या पराभवामुळे चेल्सीला यंदा जूनमध्ये होणारा युरोपियन कपही जिंकण्यासाठी स्पर्धा करता येणार नाही.

(Manchester City beat Chelsea 4-0 in FA Cup)

यापूर्वी गेल्या आठवड्यात मँचेस्टर सिटीने गुरुवारी प्रीमियर लीगमध्ये चेल्सीला पराभूत केले होते. दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने एर्लिंग हालंड आणि केविन डी ब्रुयन यांना विश्रांती दिली होती. मँचेस्टर सिटीने त्यांच्या दोन स्टार खेळाडूंशिवाय देखील चेल्सीला एकतर्फी पराभूत केल्याने चेल्सी चाहत्यांकडून संघाचे मॅनेजर ग्रॅहम पॉटर यांच्याबद्दल निराशा व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे मँचेस्टर सिटीने पहिल्या हाफमध्ये 15 मिनिटांच्या आत 3 गोल नोंदवले होते. या सामन्यातही मँचेस्टर सिटीसाठी रियाद माहरेजची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने प्रीमियर लीगच्या सामन्यातही सिटीसाठी एक गोल नोंदवला होता.

एफए कपच्या सामन्यात मँचेस्टर सिटीसाठी रियाद, ज्युलियन अल्वारेज आणि फिल फोडेन यांनी गोल नोंदवले.

रियाद माहरेजने रविवारी मँचेस्टर सिटीसाठी पहिला गोल 23 व्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर 30 व्या मिनिटाला अल्वारेजने पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये करण्यात यश मिळवले आणि मँचेस्टर सिटीला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 8 मिनिटाच्या अंतरातच किल वाकरने दिलेल्या पासवर फोडेनने मँचेस्टर सिटीसाठी तिसरा गोल नोंदवला.

पहिल्या हाफमध्ये मँचेस्टर सिटीने 3-0 ही आघाडी राखून ठेवली. दुसऱ्या हाफमध्येही त्यांनी वर्चस्व राखले. रियाद माहरेजने दुसऱ्या हाफमध्ये 85 व्या मिनिटाला पेनल्टीवर त्याचा सामन्यातील वैयक्तिक दुसरा आणि मँचेस्टर सिटीसाठी चौथा गोल नोंदवला. त्यामुळे मँचेस्टर सिटीने हा सामना सहज जिंकला.

दरम्यान, मँचेस्टर सिटी सामन्यापूर्वी सरावादरम्यान चेल्सी संघाने इटलीचे फुटबॉलपटू जॅनल्यूक विऍली यांच्या सन्मानार्थ 9 क्रमांकाची जर्सी घातली होती. विऍली यांचे 6 जानेवारी रोजी निधन झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT