युरो कप फुटबॉल स्पर्धेला (Euro Cup Football Tournament) आजपासून सुरुवात झाली असून, पहिल्या सामन्यात इटलीने (Italy) तुर्कीचा (Turkey) 3-0 असा परभव करत युरो कपमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजता वेल्स (Wales) वि. स्वित्झर्लंड (Switzerland) यांच्यात सामना रंगणार आहे. मागील स्पर्धेत स्वित्झर्लंड संघाने बाद फेरीत प्रवेश केला होता, तर वेल्सने उपांत्य फेरीत धडक मारली होती. (Euro Cup's 'Kick' begins, Italy's victory in the first match)
2012 च्या पात्रता स्पर्धेत वेल्सचा स्वित्झर्लंडविरुद्ध 3-2 विजय, तो विजय 1951 नंतर प्रथमच होता. सराव सामन्यात वेल्सला एकही गोल करता आला नाही, तर स्वित्झर्लंडने गेल्या पाच सामन्यांत विजय मिळविला आहे. राष्ट्रीय लीग विजेत्या संघातील एकही खेळाडू वेल्स संघात नाही, सर्व खेळाडू इंग्लंडमधील दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीत खेळणारे आहेत.
स्वित्झर्लंडच्या मारिओ गाव्रानोविच याची लिश्तेनस्टाईन विरुद्ध हॅट्रीक केली. युरो सराव सामन्यातील ही एकमेव हॅट्रीक आहे. स्वित्झर्लंड संघाचा कर्णधार ग्रनित झॅका हे संघाच्या गेल्या सलग 33 सामन्यात खेळला आहे. त्यामुळे या सामन्यात स्वित्झर्लंडचे पारडे जड मानले जात आहे.
ठिकाण - बाकू ऑलिंपिक स्टेडियम, बाकू (अझरबैझान)
आमने - सामने
तपशील वेल्स स्वित्झर्लंड
एकूण लढती 7 7
विजय 2 5
एकूण गोल 16 6
युरो स्पर्धेत 4 4
विजय 1 3
एकूण गोल 3 8
या सामन्यानंतर रात्री 9.30 ला डेन्मार्क वि. फिनलंड यांच्यात लढत होणार आहे. सहयजमान डेन्मार्कची ही नववी स्पर्धा असून फिनलंड प्रथमच पात्र युरो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. गतस्पर्धेस डेन्मार्क पात्र ठरले नव्हते. या दोन्ही संघात 2011 नंतरची ही पहिलीच लढत आहे. 2011 ला डेन्मार्कने पिछाडीनंतर 2-1 विजय मिळविला होता. डेन्मार्कला फिनलंडविरुद्धच्या गेल्या 22 पैकी एकाच लढती हार पत्करावी लागली असल्याने या सामन्यात ते फेव्हरेट आहेत. तसेच फिनलंडने डेन्मार्कमध्ये 1949 नंतर एकही लढत जिंकलेली नाही.
1992 मध्ये विजेतेपद मिळविल्यानंर डेन्मार्कची कामगिरी खालावलेली आहे. डेन्मार्क गेल्या चारपैकी दोन स्पर्धास पात्र ठरला आहे. 2012 च्या स्पर्धेत डेन्मार्क गटात तिसरा होता. यंदाच्या पात्रता स्पर्धेत डेन्मार्कने धडाकेबाज खेळ करत एकही लढत गमावलेली नाही. आत्तापर्यंत ही कामगिरी केवळ पाच संघांनी केली आहे. पार्केनच्या स्टेडियमवर डेन्मार्कने चांगल्याच खेळचे प्रदर्शन करत 61 विजय संपादन केले आहेत. कोपेनहेगनमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 139 विजयाची नोंद केली आहे. पार्केन स्टेडियमवर गेल्या 11 सामन्यापैकी एकच सामन्यात त्यांचा पराभावाचा झाला आहे.
ठिकाण - पार्केन स्टेडियम, कोपेनहेगन (डेन्मार्क)
आमने - सामने
तपशील डेन्मार्क फिनलंड
एकूण लढती 65 65
विजय 39 14
एकूण गोल 161 67
युरो स्पर्धेत 2 2
विजय 2 0
एकूण गोल 2 0
युरो कपमध्ये मध्यरात्री 12.30 वाजता बेल्जीयम आणि रशिया एकमेकांसमोर भिडणार आहेत. प्रतिस्पर्धी संघात पात्रता स्पर्धेतही सामना झाला होता. त्यावेळी बेल्जीयमचे गट उपविजेत्या रशियापेक्षा सहा गुण जास्त होते. रशिया सलग पाचव्यांदा या स्पर्धेत खेळत असून बेल्जीयम सलग दुसऱ्या खेळत आहे. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर पात्रता स्पर्धेत बेल्जीयमने 4-1 सरशी मिळवली आहे. त्यात थॉर्गन आणि एदेन या हॅर्झार्ड बंधूंनी एकूण तीन गोल केले. पात्रता स्पर्धेत बेल्जीयमचे सर्वाधिक 40 गोल झाले आहेत. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर बेल्जीयमला 2018 च्या विश्वकरंडक स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. पण तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध त्यांची सरशी झाली.
सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर रशियाला 1992 पासून 14 पैकी 10 सामन्यांत विजय मिळाला आहे. तर तीन सामने बरोबरी सुटले आहेत. पण 2017 पासून रशियाला एक विजय आणि दोन बरोबरी तसेच बेल्जीयमविरुद्ध पराभावाला सामोरे जावे लागले आहे. रशियाने युरोच्या मुख्य स्पर्धेत 2012 नंतर एकही लढत जिंकलेली नाही. पण गतस्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्यांनी बरोबरी केली होती.
ठिकाण - सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम (रशिया)
आमने - सामने
तपशील बेल्जीयम रशिया
एकूण लढती 12 12
विजय 6 4
एकूण गोल 21 17
युरोतील लढती 2 2
विजय 2 0
एकूण गोल 7 2
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.