युरोपियन देशांत सर्वांत मोठी फुटबॉल स्पर्धा म्हुणुन ओळखली जाणारी स्पर्धा युरो चषक (Euro Cup 2020) आता रंगात आली आहे. आता 8 अंतिम संघामध्ये सामने होतील आणि हेच संघ पुढे जाऊन सेमी-फायनल (Semi-final) आणि त्यानंतर फायनल खेळतील. यातूनच आपल्याला युरोपचा मनाचा संघ बघायला मिळणार आहे. यात स्पेन (Spain), बेल्जियम (Belgium), इटली (Italy), स्वित्झर्लंड (Switzerland), इंग्लंड (England), चेक रिपब्लिक (Czech Republic), डेन्मार्क (Denmark), आणि युक्रेन (Ukraine) या देशांचा समावेश झाला आहे.
(EURO 2020 quarterfinals: Spain, Italy, England, Belgium will aim for silverware)
बाद फेरीच्या सामन्यात विश्वविजेते फ्रान्स, २०१८ चे विजेते पोर्तुगाल, जर्मनी अशा दिग्गज संघाना परतावे लागले असून युक्रेन, स्वित्झर्लंड सारख्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. बाद फेरीत 16 संघामधून 8 संघ स्पर्धेबाहेर तर उर्वरीत 8 संघ उपांत्य पूर्व फेरीत येऊन उभे आहेत. आता या 8 संघात आजपासुन उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल.
हे असतील ४ सामने
२ जुलै: स्वित्झर्लंड vs स्पेन (रात्री ९.३०)
३ जुलै: बेल्जियम vs इटली (मध्यरात्री १२.३०)
३ जुलै: चेक रिपब्लिक vs डेन्मार्क (रात्री ९.३०)
४ जुलै: युक्रेन vs इंग्लंड (मध्यरात्री १२.३०)
हे असतील चुरशीचे सामने
स्वित्झर्लंड विरुद्ध स्पेन
उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना स्वित्झर्लंड आणि स्पेन यांच्यात रशिया येथे शुक्रवारी खेळवण्यात जाणार आहे . यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये स्वित्झर्लंड आणि स्पेन हे दोन्ही देश पहिल्यांदाच एकमेकांसमोर येतील. १९६६ आणि १९९४ च्या विश्वचषक स्पर्धेत स्पेनने स्वित्झर्लंडवर विजय मिळवला होता. तर २०१० साली स्वित्झर्लंडने स्पेनला आश्चर्याचा धक्का दिला होता .
इटली विरुद्ध बेल्जियम
उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना बेल्जियम आणि इटली यांच्यात शनिवारी (मध्यरात्री १२.३०) जर्मनी मध्ये रंगताना दिसेल. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात सगळ्या जगाचं लक्ष्य असेल. दोन्ही संघ या हंगामात तुफान फॉर्मात आहेत.
इटलीची यूरो कप २०२० स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी दिसून आली आहे. साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रियाचा देखील पराभव केला. दुसऱ्या बाजुला रॉबेर्तो मार्टिनेझचा बेल्जियम हा संघ देखील एक ही सामना हरलेला नाही. साखळी फेरीत रशिया, डेन्मार्क, फिनलँड या देशांना धूळ चारत बाद फेरीत क्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचा १-० ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हे दोन्ही देश पाचव्यांदा एकमेकांसमोर उभे राहतील.
इंग्लंड विरुद्ध यूक्रेन
स्वीडन सारख्या बलाढ्य देशाला नमवत युक्रेन ने पहिल्यांदाच युरोच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनचा सामना आता इंग्लंडशी असेल. इंग्लंडच्या संघानी बाद फेरीत जर्मनीचा २-० नी पराभव केला होता. आता युक्रेन विरुद्ध जरी इंग्लंडचं पारडं जड दिसत असलं तरी गॅरेथ सौथगेट समोरच्या संघाला कमी लेखणार नाही. या आधी दोन्ही संघांमध्ये ७ सामने खेळवले गेले आहेत या पैकी ६ सामने हे इंग्लंड ने जिंकले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.