Philip Salt X/ICC
क्रीडा

WI vs ENG T20I: IPL लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सॉल्टचं सलग दुसरं शतक! इंग्लंडचा विंडीजला धोबीपछाड

Phil Salt: वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या T20I मध्ये इंग्लंडने शानदार विजय मिळवला. या सामन्यात सॉल्टचा सलग दुसऱ्यांदा शतकी खेळी करण्याचा कारनामा केला.

Pranali Kodre

West Indies vs England, 4th T20I, Philip Salt Century:

मंगळवारी (20 डिसेंबर) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील चौथा सामना त्रिनिदादला पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 75 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी आता झाली आहे. त्यामुळे या मालिकेतील पाचवा सामना निर्णायक ठरेल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या विजयात फिल सॉल्टचे योगदान इंग्लंडसाठी मोलाचे ठरले. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली. हे त्याचे या मालिकेतील सलग दुसरे शतक ठरले. त्याने तिसऱ्या टी20 सामन्यातही शतक झळकावले होते.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याने तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यातही सामनावीराचा पुरस्कारही जिंकला. विशेष म्हणजे या सामन्यापूर्वी मंगळवारीच दुबईत झालेल्या आयपीएल लिलावात सॉल्टला कोणत्याच फ्रँचायझीने खरेदी केले नाही.

दरम्यान, चौथ्या टी20 सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी तब्बल 268 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 15.3 षटकात 192 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात वेस्ट इंडिजकडून 268 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सर्वच खेळाडूंनी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.

केवळ आंद्र रसेललाच अर्धशतक करता आले. त्याने 25 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. तसेच निकोलस पूरनने 15 चेंडूत 39 धावा केल्या, तर शेरफेन रुदरफोर्डने 15 चेंडूत 36 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

इंग्लंडकडून रिस टोप्लीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. तसेच सॅम करन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. त्याचबरोबर मोईन अली, ख्रिस वोक्स आणि आदिल राशिद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, इंग्लंडकडून फिल सॉल्ट आणि जॉस बटलर यांनी शानदार सुरुवात केली होती. सॉल्ट आणि बटलरने 117 धावांची सलामी दिली. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोननेही आपल्या फलंदाजीचा तडाखा दिला.

सॉल्टने 57 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 119 धावांची खेळी केली. तसेच जॉस बटलरने 29 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्याचबरोबर लिव्हिंगस्टोनने 21 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने 20 षटकात 3 बाद 267 धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेन, जेसन होल्डर आणि आंद्र रसेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT