India Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

INDW Vs ENGW: टीम इंडिया हारली! शफाली-रेणुकाची जादू चालली नाही; टी-20 मालिकेत इंग्लंडने नोंदवला पहिला विजय!

India Women vs England Women, 1st T20I: भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे.

Manish Jadhav

India Women vs England Women, 1st T20I: भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (6 डिसेंबर 2023) वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकण्यात इंग्लिश महिला संघाला यश आले. या सामन्यादरम्यान, नाणेफेक हारुन प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या इंग्लंडने निर्धारित षटकांत 6 गडी गमावून 197 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला निर्धारित षटकांत 6 गडी गमावून केवळ 159 धावाच करता आल्या. अशाप्रकारे या रोमांचक सामन्यात इंग्लिश महिला संघाने 38 धावांनी विजय मिळवला.

नेट सायव्हर ब्रंट आणि डॅनी व्याट यांनी टोन सेट केला

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या नेट सायव्हर ब्रंट आणि डॅनी व्याट यांनी अर्धशतके झळकावली. संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ब्रंटने 53 चेंडूत 77 धावा केल्या. तर डावाची सुरुवात करताना व्याटने 47 चेंडूत 75 धावांचे योगदान दिले. या दोघींशिवाय सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्सने 255.55 च्या स्ट्राईक रेटने केवळ नऊ चेंडूत 23 धावांची झटपट खेळी केली.

भारताकडून रेणुका सिंगने तीन विकेट घेतल्या

भारताकडून रेणुका सिंग ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. या सामन्यात तिने चार षटके टाकली आणि 27 धावा दिल्या. तिने आपल्या संघासाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय श्रेयंका पाटीलने दोन, तर सायका इशाकने एक विकेट घेतली.

शफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून शफाली वर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिने संघासाठी 42 चेंडूंचा सामना करत 52 धावांची अर्धशतकी खेळी खेळली, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. शफालीशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने 21 चेंडूत 26 धावांची खेळी केली. मात्र, बाकीचे फलंदाज धावांसाठी धडपडताना दिसले.

सोफी एक्लेस्टोनने तीन विकेट घेतल्या

तसेच, इंग्लिश महिला संघाच्या वतीने सोफी एक्लेस्टोनने चार षटके टाकली आणि 15 धावा देत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय फ्रेया केम्प, सारा ग्लेन आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी अनुक्रमे प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

SCROLL FOR NEXT