England Cricket Team X/englandcricket
क्रीडा

IND vs ENG: इंग्लंड संघाचे भारतात जोरदार स्वागत, पण 'या' कारणाने पाकिस्तानी मुळचा स्पिनर अडकला युएईत

England Squad: भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ सध्या भारतात पोहचला आहे.

Pranali Kodre

England Team Reached Hyderabad for Test against India:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. इंग्लंड संघ हैदराबादला रविवारी (21 जानेवारी) पोहचला.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघ हैदराबादला पोहचल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की इंग्लंडचे हैदराबादमध्ये जोरदार स्वागत झाले. त्याचबरोबर हॉटेलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

इंग्लंडचा संघ या मालिकेसाठी भारतात येण्यापूर्वी युएईमध्ये सराव करत होता. 2021 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड संघ कसोटी मालिकेसाठी भारतात आला आहे. 2021 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडला 3-1 अशा फरकाने पराभूत केले होते.

इंग्लंडचा हॅरी ब्रुक बाहेर

दरम्यान, काही कौटुंबिक कारणाने इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रुक भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागेवर डॅन लॉरेन्सला इंग्लंड संघात संधी देण्यात आली आहे. लॉरेन्स सोमवारपर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे.

शोएब बाशिर युएईमध्येच

या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान मिळालेला 20 वर्षीय फिरकीपटू शोएब बाशिरला विसासाठी काही कागदपत्राच्या समस्येमुळे अद्याप भारतात येता आलेले नाही. मुळचा पाकिस्तानचा असलेला बाशिर सध्या युएईमध्येच आहे.

दरम्यान इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी माहिती दिली आहे की त्यांनी याबाबत बीसीसीआय आणि भारतीय सरकारला माहिती दिली आहे. तसेच त्यांना अपेक्षा आहे की ही समस्या लवकरच सुटेल आणि बाशिर पहिल्या सामन्यापूर्वी भारतात पोहोचेल.

असा आहे इंग्लंड संघ -

  • झॅक क्रावली, डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रुट, बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन फोक्स, ऑली पोप, जेम्स अँडरसन, गट अटकिन्सन, शोएब बाशिर, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड.

भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • 25 ते 29 जानेवारी - पहिली कसोटी, मोहाली (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 2 ते 6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 15 ते 19 फेब्रुवारी - तिसरी कसोटी, राजकोट (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 23 ते 27 फेब्रुवारी - चौथी कसोटी, रांची (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 7 ते 11 मार्च - पाचवी कसोटी, धरमशाला (वेळ: स. 9.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT