India vs England ANI
क्रीडा

World Cup 2023: टीम इंडियाला पहिल्या बॅटिंगचा पेपर गेला कठीण, इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचे आव्हान

India vs Engand: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (29 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना होत आहे. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 229 धावा केल्या.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजीसाठी उतरला. यापूर्वी या स्पर्धेत खेळलेल्या पहिल्या पाचही सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी केली होती.

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी सलामीला फलंदाजी केली. मात्र, गिल चौथ्याच षटकात 9 धावा करून बाद झाला. त्याला ख्रिस वोक्सने त्रिफळाचीत केले.

त्यापाठोपाठ 7 व्या षटकात डेव्हिड विलीने विराट कोहलीचा अडथळा दूर केला. विराट 9 चेंडू खेळूनही एकही धाव न करतान विलीच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सकडे झेल देत बाद झाला.पाठोपाठ 12 व्या षटकात वोक्सने श्रेयस अय्यरलाही 4 धावांवर माघारी पाठवले.

पण त्यानंतर रोहित शर्माला केएल राहुलने चांगली साथ दिली. या दोघांमध्ये ९१ धावांची भागीदारी झाली. मात्र, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर केएल राहुलची विकेट गेली. त्याला 39 धावांवर विलीनेच बाद केले.

त्यानंतर काही 37 व्या षटकात शतकाकडे वाटचाल करणाऱ्या रोहित शर्मालाही आदिल राशीदने बाद करत भारताला मोठा धक्का दिला. रोहित शर्माने 101 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 87 धावांची खेळी केली.

रोहित बाद झाल्यानंतर सुर्यकुमारने डाव पुढे नेला. मात्र, एका बाजूने तो फलंदाजी करत असताना रविंद्र जडेजाला राशीदने 8 धावांवर पायचीत केले, तर मार्क वूडने मोगम्मद शमीला 1 धावेवर बाद केले.

त्यानंतर जसप्रीत बुमराहने सूर्यकुमारला साथ देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची जोडी आणखी शेवटी धोकादायक ठरण्यापूर्वीच सूर्यकुमारला विलीने 47 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सूर्यकुमार 49 धावांवर खेळत असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्ना ख्रिस वोक्सकडे झेल देत बाद झाला.

पण त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी भारतीय संघ सर्वबाद होणार नाही याची दक्षता घेतली, मात्र अखेरच्या चेंडूवर बुमराह 16 धावांवर धावबाद झाला. कुलदीप 9 धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना डेव्हिड विलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्स आणि आदील राशीदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मार्क वूडने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT