England Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 मधील बाबर सेनेचा प्रवास संपला! इंग्लिश संघाने केलं 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट पक्क

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 44व्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव केला आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 44व्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमावून 337 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 43.3 षटकांत सर्व गडी गमावून 244 धावाच करु शकला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 38 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली, डेव्हिड विली आणि आदिल रशीदने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. उपांत्य फेरीत जाण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करायचा होता, पण पाकिस्तानच हा सामना हरला.

त्यामुळे आता न्यूझीलंडचा संघ 10 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. दुसरीकडे, पाकिस्तानला पराभूत करुन इंग्लंडने 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीट पक्के केले.

दरम्यान, 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकातच संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. शफीकला खाते उघडता आले नाही तर फखर जमानला केवळ एक धाव करता आली. बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली.

बाबर आझम 45 चेंडूत 38 धावा करुन बाद झाला. तर मोहम्मद रिझवान 36 धावा करुन क्लीन बोल्ड झाला. शकील 29 धावांवर क्लीन बोल्ड झाला.

इफ्तिखारने तीन आणि शादाब खानने 4 धावांचे योगदान दिले. शाहीन आफ्रिदी 25 धावा करुन बाद झाला. शेवटच्या विकेटसाठी वसीम आणि राऊफ यांच्यात 53 धावांची भागीदारी झाली.

पाकिस्तानच्या विकेट्स: 244 (43.3)

पहिली विकेट: अब्दुल्ला शफीक (0), विकेट- डेव्हिड विली, 0/1

दुसरी विकेट: फखर जमान (1), विकेट- डेव्हिड विली, 10/2

तिसरी विकेट: बाबर आझम (38), विकेट- गस ऍटकिन्सन, 61/3

चौथी विकेट: मोहम्मद रिझवान (36), विकेट- मोईन अली, 100/4

पाचवी विकेट: सौद शकील (29), विकेट- आदिल रशीद, 126/5

सहावी विकेट: इफ्तिखार अहमद (3), विकेट- मोईन अली, 145/6

सातवी विकेट: शादाब खान (4), विकेट- आदिल रशीद, 150/7

आठवी विकेट: आगा सलमान (51), विकेट- डेव्हिड विली, 186/8

नववा विकेट: शाहीन आफ्रिदी (25), विकेट- गस ऍटकिन्सन, 191/9

दहावी विकेट: हारिस राऊफ (35), विकेट- ख्रिस वोक्स, 244/10

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची (England) सुरुवात चांगली झाली होती. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांच्यात पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी झाली. डेव्हिड मलान 31 धावा करुन बाद झाला. जॉनी बेअरस्टोने 61 चेंडूत 59 धावा केल्या.

यानंतर बेन स्टोक्स आणि जो रुट यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी झाली. या दोघांच्या भागीदारीच्या जीवावर इंग्लंडने 50 षटकांत नऊ गडी गमावून 337 धावा केल्या होत्या. स्टोक्स 76 चेंडूत 84 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

जो रुटने 72 चेंडूत 60 धावा केल्या. जो रुट आणि स्टोक्स यांना शाहीन आफ्रिदीने बाद केले. तर हॅरी ब्रूक 17 चेंडूत 30 धावा करुन बाद झाला. जोस बटलर धावबाद झाला. हारिस राऊफने अखेरच्या षटकात मोईन अलीला क्लीन बोल्ड केले.

इंग्लंडच्या विकेट्स: 337/9 (50)

पहिली विकेट: डेव्हिड मलान (31), विकेट- इफ्तिखार अहमद, 82/1

दुसरी विकेट: जॉनी बेअरस्टो (59), विकेट- हारिस राऊफ, 108/2

तिसरी विकेट: बेन स्टोक्स (84), विकेट- शाहीन आफ्रिदी, 240/3

चौथी विकेट: जो रुट (60), विकेट- शाहीन आफ्रिदी, 257/4

पाचवी विकेट: हॅरी ब्रूक (30), विकेट- हारिस राऊफ, 302/5

सहावी विकेट: जोस बटलर (27), विकेट- रनआउट, 308/6

सातवी विकेट: मोईन अली (8), विकेट- हारिस राऊफ, 317/7

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT