England Team Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: उपांत्य सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव, इंग्लंडची फायनलमध्ये 'धडक'

IND vs ENG T20 World Cup 2022: प्रत्युत्तरात इंग्लंडने 24 चेंडू राखून एकही विकेट न गमावता सामना जिंकला.

दैनिक गोमन्तक

India vs England T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा एकतर्फी सामन्यात 10 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर इंग्लंड आता फायनलमध्ये पोहोचला आहे. जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, ज्याने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 24 चेंडू राखून एकही विकेट न गमावता सामना जिंकला.

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून विराट कोहलीशिवाय हार्दिक पंड्याने अर्धशतक झळकावले. भारतीय संघाला पहिला झटका केएल राहुलच्या रुपाने बसला, तो 5 धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला, ख्रिस जॉर्डनने त्याला 27 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

तसेच, आदिल रशीदने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) 14 धावांवर बाद करुन टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. भारताने 75 धावांवर तिसरी विकेट गमावली. हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कोहली 50 धावा करुन बाद झाला. भारताने 136 धावांवर चौथी विकेट गमावली. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) शेवटच्या चेंडूवर आऊट झाला, त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या.

इंग्लंडचा संघ 10 गडी राखून जिंकला

हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 20 षटकात 169 धावा करायच्या होत्या. दुसरीकडे, इंग्लंडने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले. जोस बटलरने नाबाद 80 आणि अॅलेक्स हेल्सने नाबाद 86 धावा केल्या. टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना आता इंग्लंड (England) आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT