England Won T-20 WC Dainik Gomantak
क्रीडा

England Won T-20 WC: पाकिस्तानला हरवून इंग्लड विश्वविजेता; स्टोक्सचा पाकिस्तानला 'शॉक'

इंग्लंडच्या बेन स्टोक्सची निर्णायक क्षणी फटकेबाजी; अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 राखून विजय

गोमन्तक डिजिटल टीम

T-20 World Cup 2022: अष्टपैलू बेन स्टोक्स याने निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवून वर्ल्डकपवर इंग्लंडचे नाव कोरले आहे. इंग्लंडने एक ओव्हर आणि 5 गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला.

इंग्लंडने 2019 चा वनडे वर्ल्डकप देखील जिंकला आहे. आता टी 20 वर्ल्डकप जिंकत इंग्लंडने इतिहास रचला. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने नाबाद 52 धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला. 138 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पाकिस्ताननेही पॉवर प्लेच्या सुरूवातीला दोन धक्के दिले. शाहीन आफ्रिदीने अॅलेक्स हेल्सचा अवघ्या 1 धावेवर त्रिफळा उडवला तर चौथ्या षटकात हारिस रौऊफने फिलिप सॉल्टला 10 धावांवर बाद केले. इंग्लंडचा डाव एकहाती सांभाळून आक्रमक सुरूवात करणाऱ्या जॉस बटलरला हारिस रौऊफने 26 धावांवर बाद केले. बटरलने 17 चेंडूत 26 धावा करत इंग्लंडला पाच षटकात 43 धावांपर्यंत पोहचवले होते.

पाकिस्तानच्या कसलेल्या गोलंदाजांनी दमदार मारा करत इंग्लंडला फार धावा करू दिल्या नाहीत. त्यानंतर शादाब खानने 23 चेंडूत 20 धावा करणाऱ्या हॅरी ब्रुक्सला बाद केले. यामुळे बॉल टू रन असलेला सामना आता 15 व्या षटकात 30 चेंडूत 41 धावा असा आला. त्यानंतर बेन स्टोक्स याने निर्णायक क्षणी फटकेबाजी धावगती वाढवली. त्याने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला मोईन अलीचीही साथ मिळाली. पण 19 व्या षटकात मोईन अली (19 धावा) आऊट झाला. तथापि, बेन स्टोक्सने दडपण न घेता एक ओव्हर राखूनच इंग्लंडला विजय मिळवून दिला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने 32 धावा केल्या.

सॅम करनने पाकिस्तानची जमू पाहणारी जोडी फोडली. त्याने मोहम्मद रिझवानला 15 धावांवर बाद करत 29 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का दिला. आदिल राशिदने पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. त्याने आक्रमक वृत्तीच्या मोहम्मद हारिसला 8 धावांवर बाद केले. हारिस बाद झाल्यानंतर आझम आणि शान मसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. मात्र राशिद खानने आझमला 32 धावांवर बाद केले.

पुढच्याच षटकात बेन स्टोक्सने इफ्तिकार अहमदला शुन्यावर बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. पाकिस्तानची अवस्था 4 बाद 85 अशी झाली असताना शान मसूदने 28 चेंडूत 38 धावा करून पाकिस्तानचा डाव सावरला होता. मात्र सॅम करनने त्याला 17 व्या षटकात बाद करत पाकिस्तानला पाचवा धक्का दिला. पाकिस्तानचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनने उरलेल्या पाकिस्तान संघाला एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॅम करनने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर ख्रिस जॉर्डनने दोन आणि आदिल राशिदने देखील 2 बळी टिपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT