Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, Test: जयस्वालच्या द्विशतकानंतर बुमराहच्या 6 विकेट्सने; दुसऱ्या दिवसाखेर भारताकडे 171 धावांची आघाडी

India vs England, 2nd Test: विशाखापट्टणम कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसाखेर 171 धावांची आघाडी घेतली आहे. दुसरा दिवस यशस्वी जयस्वाल आणि जसप्रीत बुमराह यांनी गाजवला.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, 2nd Day:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात विशाखापट्टणमला कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 षटकात 28 धावा केल्या आहेत. त्यामुळे दुसरा दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताकडे 171 धावांची आघाडी होती.

दुसऱ्या डावात भारताकडून रोहित शर्मा 13 धावांवर आणि यशस्वी जयस्वाल 15 धावांवर नाबाद आहे.

इंग्लंडचा पहिला डाव 55.5 षटकात 253 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली आहे. या डावात भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ६ विकेट्स घेतल्या.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघ 396 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला होता. इंग्लंडकडून बेन डकेट आणि झॅक क्रावली यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनी 59 धावांची भागीदारी केली होती. पण कुलदीपने बेन डकेटला चकवले. त्यामुळे तो 21 धावांवर बाद केले.

पण त्यानंतरही क्रावलीने आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. त्याने ऑली पोपबरोबरही अर्धशतकी भागीदारी करत इंग्लंडला 20 षटकांच्या आतच 100 धावांचा टप्पा पार करून दिला होता.

अखेर अक्षर पटेलने 23 व्या षटकात टाकलेल्या चेंडूवर श्रेयस अय्यरने घेतलेल्या अप्रतिम झेलने क्रावलीची खेळी संपुष्टात आली. क्रावलीने 78 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले.

यानंतर मात्र इंग्लंडच्या संघाला जसप्रीत बुमराहने बेजार केले. सुरुवातीच्या षटकांनंतर चेंडूला रिव्हर्स स्विंग मिळत असल्याने बुमरागने त्याचा फायदा घेतला. त्याने आधी जो रुटला 5 धावांवर आणि ऑली पोपला 23 धावांवर माघारी धाडले.

यानंतर कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण बेअरस्टोलाही बुमराहनेच 25 धावांवर माघारी धाडले. तसेच बेन फोक्सला ६ धावांवर कुलदीप यादवने त्रिफळाचीत केले. त्यामुळे इंग्लंड संघ संकटात सापडला होता. त्यातच रेहान अहमदलाही कुलदीपने बाद करत इंग्लंडला 7 वा धक्का दिला.

परंतु, एका बाजूने बेन स्टोक्सने डाव सांभाळला होता. मात्र त्यालाही बुमराहने सुरेख चेंडू टाकत 47 धावांवर त्रिफळाचीत केले. पण तरीही इंग्लंडचे शेपूट वळवळले आणि त्यांनी इंग्लंडला 250 धावांचा टप्पा पार करून दिला. टॉम हर्टली 21 धावा केल्या, तर जेम्स अँडरसनने 6 धावा केल्या आणि शोएब बशीर 8 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना बुमराहने 15.5 षटकात 45 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. तसेच त्याच्याव्यतिरिक्त या डावात कुलदीप यादवेनेही 3 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताचा पहिला डाव दुसऱ्याच दिवशी 112 षटकात 396 धावांवर संपला होता. त्यामुळे पहिल्या डावात भारताला 143 धावांची आघाडी मिळाली होती. भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने शानदार द्विशतकी खेळी केली. त्याने 290 चेंडूत 209 धावा केल्या. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 7 षटकार मारले.

तसेच त्याच्यानंतर भारताकडून शुभमन गिल आणि रजत पाटीदार यांनाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. गिलने 34 आणि रजतने 32 धावा केल्या.

इंग्लंडकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच टॉम हर्टलीने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT