Stuart Broad Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IRE: स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्सवर रचला इतिहास, 10 वर्षांनंतर केला 'हा' पराक्रम

Stuart Broad: ब्रॉडने 17 षटकात 51 धावा देत 5 बळी घेतले. पाचव्या षटकात पीजे मूरला एलबीडब्ल्यू करुन त्याने ही सुरुवात केली.

Manish Jadhav

ENG vs IRE: इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने गुरुवारपासून लॉर्ड्सवर सुरु झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी आपल्या शानदार गोलंदाजीने प्रभावित केले.

ब्रॉडने 17 षटकात 51 धावा देत 5 बळी घेतले. पाचव्या षटकात पीजे मूरला एलबीडब्ल्यू करुन त्याने ही सुरुवात केली. त्यानंतर कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला शून्यावर, हॅरी टेक्टरला शून्यावर, जेम्स मॅक्युलमला 36 धावांवर तर मार्क एडेअरला 14 धावांवर बाद करुन त्याने आयरिश फलंदाजी उद्ध्वस्त केली.

ब्रॉडच्या शानदार गोलंदाजीसमोर आयर्लंडचा संघ 56.2 षटकांत 172 धावांत आटोपला. 10 वर्षांनंतर लॉर्ड्सवर त्याने मोठी कामगिरी केली.

लॉर्ड्सवर स्टुअर्ट ब्रॉडची तिसरी 5 विकेट

खरे तर, स्टुअर्ट ब्रॉडची लॉर्ड्सवर 5 विकेट घेण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी त्याने 2013 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

सुमारे 10 वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात 11 षटकात 44 धावा देत 7 बळी घेतले होते. गुरुवारी त्याने या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.

तसेच, लॉर्ड्सवर सर्वाधिक विकेट घेणारा ब्रॉड हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. 27 सामन्यांच्या 52 डावांमध्ये त्याच्या नावावर 107 विकेट आहेत. या एपिसोडमध्ये नंबर-1वर इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनचा कब्जा आहे.

अँडरसनने लॉर्ड्सवर 27 सामन्यांच्या 52 डावात 117 विकेट घेतल्या आहेत. अँडरसनने 7 वेळा, तर ब्रॉडने तीन वेळा हा पराक्रम केला आहे.

जगातील पाचवा गोलंदाज

कसोटी इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा स्टुअर्ट ब्रॉड हा जगातील पाचवा गोलंदाज आहे. त्याने 162 सामन्यांच्या 298 डावात 581 विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेपासून (Anil Kumble) 38 विकेट दूर आहे.

चौथ्या क्रमांकावर असलेल्या कुंबळेच्या नावावर 619 बळींचा विक्रम आहे. पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 800 विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्न 708 विकेट्ससह आणि जेम्स अँडरसन 685 विकेट्ससह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Margao: 'सोपो' शुल्कात कोणतीही वाढ नाही, जुनेच दर कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका; मडगाव पालिकेचं स्पष्टीकरण

Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

Goa Congress Protest: काँग्रेसीचो धोल बडयत निशेद; Watch Video

SCROLL FOR NEXT