ENG vs IND यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (At Lord's Cricket Ground) खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर के एल राहुलने (K. L. Rahul) इंग्लंडविरुद्ध (England) शतक झळकावून इतिहासात (In history) आपले नाव कोरले. जो रूटने (Joe Root) नाणेफेक जिंकून टीम इंडियाला (Team India) प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. राहुलने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद 127 धावांची खेळी केली, हे त्याच्या कारकिर्दीतील 6 वे कसोटी शतक आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर प्रत्येक फलंदाजचे शतक ठोकण्याचे स्वप्न असते. कारण फलंदाजाने येथे शतक केल्यास ते या मैदानावर ऐतिहासिक शतक मानले जाते. आणि त्या फलंदाजाचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डमध्ये नोंदवले जाते.
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शतक झळकावणारा लोकेश राहुल तिसरा भारतीय सलामीवीर आहे. या आधी विनु मांकड (184 धावा) 1952 मध्ये या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. 38 वर्षांनंतर, 1990 मध्ये, रवी शास्त्री (100 धावा) लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दुसरे भारतीय सलामीवीर होते. 31 वर्षांनंतर, लोकेश राहुल लॉर्ड्सवर शतक झळकावणारा तिसरा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
लोकेश राहुल इंग्लंडमध्ये 1 पेक्षा जास्त शतक झळकावणारा पाचवा भारतीय सलामीवीर ठरला आहे. लोकेश राहुलच्या आधी, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, विजय मर्चंट, रवी शास्त्री यांनी सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये 1 पेक्षा जास्त शतके करण्याचा विक्रम केला आहे.
हे शतक भारतीय फलंदाजासाठीही खास आहे. कारण जवळजवळ 3 वर्षानंतर राहुलच्या बॅटमधून शतक निघाले आहे. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीतच शतक ठोकले होते.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 3 गडी बाद 276 धावा केल्या आहेत. सध्या लोकेश राहुल 127 धावांवर नाबाद असून, अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत आहे. सलामीवीर रोहित शर्माने 83 धावा केल्या आणि कर्णधार विराट कोहली 42 धावांवर बाद झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.