बर्मिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रथमच टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे बुमराहला संधी देण्यात आली. कर्णधारपद मिळाल्यानंतर बुमराहने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'भारतीय संघाचा कर्णधार होण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.' बर्मिंगहॅम कसोटीत टीम इंडिया चार गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे. यासोबतच एका अष्टपैलू खेळाडूलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. (Jasprit Bumrah India vs England Birmingham)
बर्मिंगहॅम कसोटीसाठी नाणेफेक करण्यापूर्वी बुमराह म्हणाला, “ही खूप चांगली भावना आहे आणि एक उपलब्धी देखील आहे. यापेक्षा चांगले काहीही मिळू शकत नाही. मी खूप उत्साही आहे आणि पुढे जाण्यास उत्सुक आहे. मी तयारीबद्दल देखील आनंदी आहे. इंग्लंडच्या खेळाची सवय होण्यासाठी मला अधिक वेळ द्यावा लागला. आम्ही चार गोलंदाजांसह मैदानात उतरलो आहोत. त्यात माझ्यासोबत सिराज, शार्दुल आणि शमी यांचा समावेश आहे. यासोबतच जड्डू (रवींद्र जडेजा) याला अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. रोहित कोविड 19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. रोहितला संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर, मयंक अग्रवालला त्याचे कव्हर म्हणून बर्मिंगहॅमला बोलावण्यात आले. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. टीम इंडियाने शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांचा फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.