INDvsENG: भारत-इंग्लंड सामन्यात जसप्रीत बुमराहची 'कसोटी'

जसप्रीत बुमराहला हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी
Jaspreet Bumrah
Jaspreet BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

India Vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. मात्र वर्षभरानंतर आता या मालिकेतील निर्णायक सामना आयोजित केला जात आहे. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी तर आहेच, पण तो एक विशेष स्थानही गाठू शकतो. (IND Vs ENG Jasprit Bumrah)

या मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह हा भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. बुमराहने चार सामन्यांत 18 विकेट घेतल्या आहेत. या मालिकेत ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक 21 विकेट घेतल्या आहेत. पण रॉबिन्सन दुखापतीमुळे या सामन्याचा भाग नाही. अशा परिस्थितीत बुमराहने शेवटच्या कसोटीत चार विकेट्स घेतल्यास तो या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरेल.

Jaspreet Bumrah
ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा जसप्रीत बुमराह, फिरकी गोलंदाजी सोडून अचूक यॉर्कर्सचा प्रयत्न

जसप्रीत बुमराहनंतर मोहम्मद सिराज हा इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. सिराजने 14 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमी तीन सामन्यांत 11 बळी घेऊन मालिकेतील भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

अँडरसनचे आव्हान

जसप्रीत बुमराहला मात्र फॉर्मात असलेल्या जेम्स अँडरसनकडून कडवे आव्हान मिळू शकते. अँडरसनने 4 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. अँडरसनला या सामन्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले असून तो भारताच्या फलंदाजांना दमवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जो रूट आघाडीवर आहे. जो रूटने चार सामन्यांत 500 हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या दुसरा कोणताही फलंदाज रूटला हरवण्याच्या स्थितीत दिसत नाही.

Jaspreet Bumrah
जसप्रीत बुमराह करणार इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व

दरम्यान, कपिल देव यांच्यानंतर बुमराह हा भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. कपिलने अखेरची 1987 मध्ये संघाची जबाबदारी स्वीकारली होती. म्हणजेच 35 वर्षांनंतर हा योगायोग घडला आहे. बुमराहने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत पहिल्यांदाच ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याला आयर्लंडविरुद्ध कर्णधारपदाची संधी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com