Eng Vs Ind: 4th Test Oval India Win  Tweeter / @ICC
क्रीडा

Eng Vs Ind: भारत कसोटी मालिकेत 2 - 1 ने आघाडीवर

भारताचा इंग्लंड विरुद्ध चौथ्या सामन्यात 157 धावांनी विजयी (Eng Vs Ind)

Siddhesh Shirsat

ओव्हल (Oval) येथे सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत (Eng vs Ind 4th Test) कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे (India Leading Series 2 - 1). रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारताने 157 धावांनी विजय मिळवला, या सामन्यातील दुसऱ्या दवात केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर रोहित शर्माला सामनावीरम्हणून घोषित करण्यात आले.

काल चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने दिलेल्या 368 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या सलामीवीरांनी इंग्लंड संघासाठी चांगली सलामी दिली व चौथ्या दिवसअखेर इंग्लंड संघाने बिनबाद 77 धावा बनवल्या होत्या, त्यामुळे भारतीय संघाच्या आशा थोड्याश्या मावळलेल्या होत्या.

आज खेळाच्या अंतिम दिवशी सुद्धा इंग्लंड संघाने आपला कालचा फॉर्म राखताना साधगिरीने आव्हानच पाठलाग करू लागले. आता विजय भारताच्या हातून निसटणार असे दिसत असताना शार्दुल ठाकुर ने रॉरी बर्न्स याला 50 धावांवर रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. व इंग्लंड संघाच्या मानसुब्यांना धक्का दिल. त्यानंतर आलेला फलंदाज डेव्हिड मलान फार काळ टिकू शकला नाही व 5 धावांवर असताना अतिरिक्त खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या मयंक अग्रवाल थ्रोवर यष्टिरक्षक रिषभ पंतने त्याला धावबाद केले. व इंग्लंड संघाच्या फलंदाजीला तडा गेला. ठराविक अंतराने हसीब अमीन या फलंदाजाला लेग स्पिनर रवींद्र जडेजा याने त्रिफळाचीत केले व इंग्लंड संघाला परभवाच्या छायेत ढकलले. इंग्लंड तर्फे हसीब हमीद याने सर्वाधिक 61 धावा जमवल्या.

त्यानंतर ओली पोप 2 धावा व जॉनी बेअरस्टो याना बुमराहने बाद केले, जॉनी बेअरस्टो व मोईन अली खतेही उघडू शकले नाही. नंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट 36 धावावर असताना शार्दूल ठाकूरने त्याला त्रिफळाचीत केले व इंग्लंड संघाचा पराभव स्पष्ट दिसू लागला. ख्रिस वोक्स 18 धावा याला उमेश यादवने तंबूत धाडले. चहापानापर्यंत 8 बाद 193 धावा अशी बिकट अवस्था झाली होती. त्यानंतर आलेले फलंदाज क्रेग ओव्हरटन 10 धावा व जेम्स अँडरसन 2 धावा यांना उमेश यादव ने बाद करून 210 इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला रॉबिनसन 10 धावांवर नाबाद राहीला. व भारताने 157 धावांनी इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवला.

(संक्षिप्त धावफलक: भारत प. डाव स 191, इंग्लंड प. डाव 290, भारत दु. डाव 466, इंग्लंड दु. डाव 210. भारत 157 धावांनी विजयी, रोहित शर्मा सामनावीर)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT