अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) मँचेस्टर (Manchester)कसोटीतून डच्चू देऊन, जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.
अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) मँचेस्टर (Manchester)कसोटीतून डच्चू देऊन, जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: पाचव्या कसोटीत अजिंक्यला डच्चू, बुमराहला विश्रांती, अश्विन संधी?

दैनिक गोमन्तक

ENG vs IND: अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) मँचेस्टर (Manchester)कसोटीतून डच्चू देऊन, जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत (Test series) भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विराट सेनेने अप्रतिम कामगिरी करत सामना 157 धावांनी जिंकला. आता पाचव्या आणि अंतिम कसोटी सामना 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. एकीकडे टीम इंडियाला जिथे जिंकायला किंवा ड्रॉ करायचा प्रयत्न करेल. तर इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला हरवून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवायची आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना शेवटच्या सामन्यात मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरावे लागणार आहे.

अजिंक्य रहाणे शेवटचा कसोटी सामना खेळणार?

अजिंक्य रहाणे टीम इंडियासाठी या मालिकेतील सर्वात कमकुवत दुवा असल्याचे सिद्ध झाले आहे. संपूर्ण मालिकेत, एक अर्धशतक वगळता, त्याला विशेष काही चमत्कार दाखवता आलेला नाही. शेवटच्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी किंवा सूर्यकुमार यादवला त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. मात्र, संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी रहाणेचा बचाव केला आहे. रहाणेने या मालिकेत 15.57 च्या सरासरीने फक्त 109 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 61 धावा आहे.

जसप्रीत बुमराहला विश्रांती देता येईल का?

चौथ्या कसोटीत आपल्या भेदक गोलंदाजीतून इंग्लंड संघाची दाणादाण उडविणारा गोलंदाज जसप्रीत बुमराहला शेवटच्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. आगामी काळात बुमराह आयपीएल आणि टी -20 विश्वचषकाचा एक भाग असेल. अशा परिस्थितीत बीसीसीआय (BCCI) आणि संघ व्यवस्थापन बुमराहबाबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. बुमराहने या मालिकेत भारतासाठी 151 षटके टाकली आहेत. त्याच्या कामाचा ताण लक्षात घेऊन त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी पाचव्या कसोटीत त्याच्या जागी पुन्हा संघात येऊ शकतो.

अश्विनला संधी मिळेल का?

गेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये संघाबाहेर असलेल्या आर अश्विनलाही (R. Ashwin) शेवटच्या कसोटीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे. अश्विन संपूर्ण मालिकेत सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला आहे. तो कोणाच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल? यावर अजून निर्णय झालेला नाही.

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी/सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रवींद्र जडेजा/आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT