Anderson Took 5 wkt at Lords Cricket Ground (Eng Vs Ind) Tweeter / @ICC
क्रीडा

Eng Vs Ind: काल मिरवले... आज घसरले...

पुन्हा अँडरसन ने ५ जणांना गुंडाळले (Eng Vs Ind)

Dainik Gomantak, Siddhesh Shirsat

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील (ENG Vs Ind Test Series) दुसरा सामना काल 'लॉर्ड्स'च्या (Loards) ऐतिहासिक मैदानावर सुरू झाला इंग्लंडचा कर्णधार जॉ रूट (England Captain) याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या पचनी पडला व भारतीय फलंदाजांनी (Indian Batsman) सुरुवातीला सावध पवित्रा स्वीकारून मजबूत अशी सलामी दिली. आणि काल पहिल्या दिवस अखेर भारताने 3 बाद 276 धावा जमविल्या. यामध्ये के एल राहुल चे नाबाद शतक (KL Rahul Century) व रोहित शर्माच्या (RG Sharma) 83 धावा आणि इंग्लिश गोलंदाजांचे (English Bowler) काढलेले वाभाडे विशेष ठरले.

आज खेळाच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झाल्यानंतर भारताचे सुरुवातीच्याच षटकांमध्ये कालचे नाबाद राहिले फलंदाज के एल राहुल व अजिंक्य राहणे लगेच बाद झालेत व भारतीय संघ आता कोलमडणार अशी परिस्थिती असताना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव थोडाफार सावरण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील भारतीय संघ दुसऱ्या दिवशी विशेष कामगिरी करू शकला नाही व कालच्या धावसंख्येत नव्वदेक धावांची मोजकीच भर घालून तंबूत परतला. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने 5 गडी रॉबिन्सन व मार्क वूड यांनी प्रत्येकी 2 तर मोईन अलीने 1 गडी बाद केला. व भारतीय संघ 364 धावांत आटोपला. (James Anderson took 5 Wickets)

इंग्लंडच्या फलंदाजांनी देखील आपल्या डावाची सुरुवात काहीशी सावध व संथपणे केली. भारतीय गोलंदाजांना सन्मान देत बचावात्मक पवित्रा स्वीकारला. इशांत शर्मा व बुमराह यांची गोलंदाजी खेळून काढल्यानंतर मोहम्मद सिराजला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले व सिराजने लगेचच इंग्लंडच्या 2 खेळाडूंना तंबूत धाडले. डॉमनिक सिबली 11 धावा व हसीब हमिद 0 यांना पाठोपाठ बाद करत 2 धक्के दिले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने 30 षटकांअखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावा जमवल्या. रोरी बर्न्स 35 धावा तर कर्णधार जो रूट 24 धावांवर नाबाद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT